प्रभासचा 'आदिपुरुष' पुन्हा पोहोचला कोर्टात..प्रमाणपत्राविनाच टीझर रिलीज केल्याचा होतोय आरोप

मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला' आदिपुरुष' सिनेमावरुन निर्माण झालेला वाद दिवसागणिक वाढत चालला आहे.या चित्रपटातील प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांच्या लूकवरून प्रचंड चर्चा आणि वाद झाला होता होता.पुन्हा एकदा हा चित्रपट वेगळ्याच कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.झालं असं की,या चित्रपटाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न घेता चित्रपटाचा टीझर रिलीज केल्याचा दावा करण्यात आला होता. आता या प्रकरणी न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाकडून उत्तर मागितले आहे. खंडपीठाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी २१ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली.अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाकडे उत्तर मागितले आहे.



या याचिकेत असे म्हटले आहे की, चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न घेता आदिपुरुष चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. असे प्रोमो रिलीज करणे नियमांच्या विरोधात असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. चित्रपटात देवी सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिती सेननने परिधान केलेल्या कपड्यांच्या डिझाईनवरही याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे.शिवाय या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या भूमिकेबद्दल वाद झाले आहेत. लोकांची प्रभू राम आणि देवी सीता यांच्यावर नितांत श्रद्धा आहे, मात्र चित्रपटात ते लोकांच्या श्रद्धेच्या विरोधात दाखवण्यात आल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

याचिकेत रावणाच्या लूक बाबतही आक्षेप घेण्यात आला आहे. प्रभू राम, माता सीता आणि रावणाच्या भूमिका साकारणारे अभिनेते प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, तसेच हनुमानाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सनी सिंग, चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक ओम राऊत एकंदरीत या सर्वांवरच याचिकेत आरोप करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने