सर्वेक्षणात मविआला महाराष्ट्रात भरघोस यश; पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांना...

मुंबई : इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षण केले आहे. ज्यामध्ये एनडीए सरकारच्या कामकाजाबाबत देशातील लोकांची मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व्हेत युपीए अर्थात महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या ३४ जागा दाखवण्यात आल्या आहेत. अर्थात भाजप आणि शिंदे गटाच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 

शरद पवार म्हणाले की, सी व्होटर्सचा सर्व्हे मी पाहिला. त्यात असं दिसतं, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत आहे. महाराष्ट्रातील आकडेवारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. सर्व्हे करणाऱ्या संस्थेची सत्यता याआधीही स्पष्ट झालेली आहे. पण मी त्यावर विश्वास ठेवणार नाही. मात्र या सर्व्हेने दिशा दाखवली असून ती दिशा सत्ताधाऱ्यांसाठी सोयीची नाही, असं दिसत, असल्याचंही पवार म्हणाले.



कर्नाटकचा सर्व्हे वेगळा आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार राहणार नाही. पण उत्तर प्रदेश सर्वात मोठा भाग आहे. मात्र तेथील ठराविक माहिती आमच्याकडे नाही, असंही पवार म्हणाले.यावेळी शरद पवार यांनी विरोधकांच्या एक्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, सध्या प्रयत्न सुरू आहे. मात्र स्थानिक मुद्दे आहेत. केरळमध्ये डाव्यांसह राष्ट्रवादीचं सरकार आहे. तर काँग्रेस आमचा विरोधीपक्ष आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवर आम्ही एकत्र येऊ इच्छितो, असंही पवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने