तंत्रज्ञानात भारताचा डंका वाजणार; स्वदेशी 'भरोस' ची चाचणी

मद्रास: गेल्या काही दिवसांपासून अनेक क्षेत्रात भारताचा डंका वाजत आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत अनेक तंत्रज्ञान विकसित करण्यात येत असून, यामुळे जगभरातील देशांचे लक्ष भारताकडे लागले आहे.यामध्ये भर टाकणारं आणि भारतींयांची छाती गर्वानं उंचावणारं पाउलं टाकण्यात आले आहे. स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम (OS) BharOS ची चाचणी आज करण्यात आली.हे मोबाईल ओएस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या (IIT मद्रास)इनक्यूबेटेड फर्मने विकसित केले आहे. हे सॉफ्टवेअर व्यावसायिक ऑफ-द-शेल्फ हँडसेटवर स्थापित केले जाऊ शकते.केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी IIT मद्रासने विकसित केलेल्या मेड इन इंडिया मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम 'BharOS' ची चाचणी केली.




भरोस म्हणजे काय?

भरोस, ज्याला भारोस देखील म्हणतात. ही एक स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आहे. ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या इनक्यूबेटेड फर्मने विकसित केली आहे.भारतातील 100 कोटी मोबाईल फोन वापरकर्त्यांना या ओएसचा फायदा होईल असा दावा केला जात आहे. या OS ची खास गोष्ट म्हणजे यात हाय-टेक सुरक्षा आणि गोपनीयता देण्यात आली असून, या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये, वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार अॅप्स निवडण्यासाठी आणि वापरण्यासाठी अधिक स्वातंत्र्य, नियंत्रण देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने