पुणे 'तोडपाणी' करण्यात एक नंबर, लाचखोरीत अव्वल! कोणतं 'खातं' आघाडीवर

पुणे: 'पुणे तिथे काय उणे' असं म्हणटं जाते. तसचं पुणे सर्वच क्षेत्रात परिपूर्ण आहे. मग ते शिक्षण असो, गुन्हेगारी असो, तसेच विकास असो किंवा विकासाच्या आडून केलाला भ्रष्टाचार दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पुण्यात सर्वधिक लाचखोरी करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेल्या संख्यांमधून उघड झाली आहे. त्यामुळे पुण्यातील भ्रष्टाचार राज्यात गाजत आहे.पुण्यापाठोपाठ लाचखोरीत नाशिक दुसऱ्या क्रमांकावर तर औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२२ मध्ये पुणे विभागात लाच मागितल्या प्रकरणी 155 गुन्हे दाखल करण्यात आले, तर 223 शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे.



नाशिक विभागामध्ये हिच संख्या 126 गुन्हे दाखल करण्यात आले असून 178 आरोपींना रंगेहात पकडण्यात यश आले आहे. दरम्यान सर्वाधिक लाच ही महसूल विभाग, भूमी अभिलेखन विभाग, नोंदणी विभाग या विभागांमध्ये सर्वाधिक 175 प्रकरणे समोर आले आहेत.तर महसूल विभागात 175 प्रकरणात 246 जणांना अटक करण्यात आली आहे. महसूल नंतर पोलिस दलात देखील अनेक लाचखोरीचे अनेक प्रकरणं ,समोर आली आहेत. पोलिस विभागात 160 प्रकरणात 224 आरोपींना अटक करण्यात आलं आहे.

राज्यातील आकडेवारी

शहर सापळे लाचखोर

पुणे 155 223

औरंगाबाद 122 157

नागपूर 74 101

ठाणे 84 126

नाशिक 126 178

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने