दीपिका 'अमर' मी 'अकबर' जॉन 'अँथोनी'! किंग खानला नेमकं काय म्हणायचंय?

मुंबई: बॉलीवूडच्या किंग खानचा पठाण हा आता भलताच चर्चेत आला आहे. अवघ्या आठवडाभरातमध्ये या चित्रपटानं तब्बल सहाशे कोटींचा टप्पा पार केला आहे. आता त्याची वाटचाल हजार कोटींकडे सुरु झाली आहे. यासगळ्या घडामोडींवर काल शाहरुखनं मोठी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामध्ये त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला.चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शाहरुखचा पठाण प्रेक्षकांच्या भेटीला आला खरा. मात्र बॉक्स ऑफिसवर चालणार की नाही याविषयी प्रेक्षकांना शंका होती. ती खुद्द शाहरुखला देखील होती. कारण कोरोनानं मनोरंजन विश्वाला मोठा हादरा दिला होता. मोठमोठ्या कलाकारांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारले होते. त्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट, मालिकांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा अनेकांच्या डोकेदुखीचा विषय होता.



पठाण हा तर सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याचा विषय, त्यात शाहरुख खान महत्वाच्या भूमिकेत असणं आणि त्यामध्ये दीपिकानं भगव्या बिकीनीमध्ये साकारलेली भूमिका अनेकांसाठी रागाचे कारण ठरली. यामुळे शाहरुख चिंतेत होता. देशातील कित्येक राज्यांमध्ये तर त्याच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्यात यावा अशी भूमिका काही राजकीय पक्षांनी घेतली होती. मात्र पठाण प्रदर्शित झाला आणि त्यानं विक्रमी कमाई करण्यास सुरुवात केली.यासगळ्यात सध्या सोशल मीडियावर शाहरुखनं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला पठाण साकारताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याविषयी सांगितले. यावेळी त्यानं चाहत्यांनी, प्रेक्षकांनी आपल्या चित्रपटावर जे प्रेम दाखवल त्यासाठी त्यांचे आभारही मानले. आठवडाभरामध्ये पठाणनं बॉक्स ऑफिसवर जे विक्रम केले आहेत त्याचे श्रेय हे प्रेक्षकांना असल्याचे त्यानं म्हटले आहे. त्यामुळे शाहरुख सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कौतूकाचा विषय होताना दिसतो आहे.

यासगळ्यात पठाण फेम शाहरुखनं चित्रपटाच्या निमित्तानं कलाकारांमध्ये जे भावनिक नातं निर्माण झालं. आमच्यात आता मी अकबर आहे, दीपिका अमर आहे तर जॉन हा अँथोनी झाला आहे. हे सांगताना मला आनंद होतो आहे. अशी प्रतिक्रिया शाहरुखनं दिली आहे. सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.किंग खानला अमर अकबर अँथोनीचा उल्लेख करुन नेमकं काय सांगायचं आहे. असा प्रश्न त्याच्याच चाहते आणि नेटकऱ्यांनी केला आहे. कदाचित त्याला त्यातून चित्रपट आम्हा तीन कलाकारांमुळे कशाप्रकारे यशस्वी झाला हे त्याला पटवून द्यायचे असेल असा अंदाज काही चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने