...तर आंबेडकरांची कोणासोबतही युती होणार नाही ; शिंदे गटाचा सल्ला की इशारा?

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीवर स्पष्टीकरण दिले. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडावी त्यानंतर आम्ही युतीचा विचार करु, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. यावर शिंदे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करु नये, अशी मागणी शिंदे गटाची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विरोधातला विरोध हा आपला मित्र हे राजकीय समीकरण आहे. निवडणुका ठाकरेंसोबतच लढवणार. भाजपला आमचा विरोध कायम आहे. भाजसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं आहे. 



शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, "राजकारणात भूमिका थोडी मागे पुढे करावी लागते. जर असे केले नाही तर मला वाटत नाही प्रकाश आंबेडकर यांची कोणासोबत युती होईल. जास्त न ताणता प्रकाश आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट करावी. जणेकरून येणाऱ्या निवडणुकीत वेगळा संदेश त्यांना देता येईल. ते मोठे नेते आहेत."

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले - 

भाजपला आमचा विरोध कायम आहे. भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली तर आम्ही विचार करु. तसेच येणाऱ्या निवडणुका एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे.आमची युती चार भितींच्या आत ठरली. मात्र त्याची घोषणा झालेली नाही. माझी आणि माझ्या पक्षाची ताकद मला माहिती आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाली. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने