PM मोदींनंतर राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; सुरक्षा भेदत...

पंजाब : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत चूक झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे.पंजाबमधील होशियारपूरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी पुढे जात असताना अचानक एक व्यक्ती सुरक्षा भेदत राहुल गांधींजवळ पोहोचला यावेळी त्याने राहुल गांधींची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला.सुरक्षा भेदत संबंधित व्यक्ती अचानक राहुल गांधींच्या जवळ पोहोचल्या काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, राहुल गांधींनी संबंधित व्यक्तीला बाजूला केले. त्यानंतर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बाहेर काढले.



अलर्ट जारी

दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा एजन्सींकडून राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.एजन्सींच्या मते राहुल गांधींच्या काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान मोठी चूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल गांधींना काश्मीरमध्ये काही ठिकाणी न फिरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.राहुल यांच्या सुरक्षेबाबत पक्षाच्या वतीने गृहमंत्रालयाला दोनदा पत्र लिहिण्यात आले असून, त्यावर केंद्राकडून राहुल गांधींनी अनेकदा सुरक्षा मानकांचे पालन केले नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने