पैसे घेऊन घराबाहेर पडलेल्या राखीसाठी विकास पाटीलनं केलेली पोस्ट चर्चेत..

मुंबई : 'बिग बॉस मराठी सिझन 4' चा फिनाले नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. शेवटपर्यंत कोण जिंकणार ही धाकधूक होती. शेवटच्या टॉप २ मध्ये अपूर्वा आणि किरण माने असतील असं वाटत असताा गेम पलटला अन् किरण माने तिसऱ्या क्रमांकावर बाद झाले.त्यानंतर आता अपूर्वाच जिंकणार असा अंदाज मोठ्या प्रमाणात लावला जात असताना आयत्यावेळेस अक्षय केळकरला विनर म्हणून जाहीर केलं अन् अनेकांच्या भूवया उंचावल्या. पण या संपूर्ण धाकधूकी दरम्यान राखी लक्षात राहिली ते तिच्या मास्टर माईंडमुळे.




३० दिवसांत ९ लाख खिशात टाकत स्पर्धेतून माघार घ्यायच्या तिच्या निर्णयामुळे.राखीनं नऊ लाख घेत स्पर्धेतून माघार घेतली ही गोष्ट तशी काही नवीन नाही. तिनं हिंदी बिग बॉसमध्ये देखील अशीच रोख रक्कम घेऊन घराबाहेर पडणं योग्य समजलं होतं. पण आता यावरनं तिच्या विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत तर काही जणं तिची प्रशंसा करताना दिसत आहेत. अभिनेता विकास पाटीलनं देखील राखीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची चर्चा रंगली आहे.विकास पाटील स्वतः बिग बॉस मराठी ४ च्या फिनाले दरम्यान होता ज्यानं स्पर्धकांना ९ लाखाची ऑफर देणाऱ्या राऊंडचे सूत्रसंचालन केले होते.विकासनं राखीसाठी केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,''आयुष्यात प्रत्येकवेळेस मनाचीच हाक न ऎकता कधीतरी बुद्धीच्या आवाजाला पण ओ द्यावी ...कित्येकदा तो आवाज तुम्हाला अनपेक्षित गोष्टी देऊन जातो.तू तेच केलंस आणि 9 लाख पदरात पाडून घेतलेस..''

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने