Manoj Bajpayee ची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला,'माझ्यासोबत संवाद थांबवा..', काय घडलं नेमकं?

मुंबई: मनोज वाजपेयीनं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक नोट शेअर करत त्याच्या चाहत्यांसोबत एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. मनोजनं त्याचं ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मनोजनं आपल्या चाहत्यांना कळकळीची विनंती करत सध्या काही दिवस माझ्याशी ट्वीटरवर संवाद साधू नका असं म्हटलं आहे.मनोज वाजपेयीनं शुक्रवारी ६ जानेवारी,२०२३ रोजी सकाळी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं, ''माझं ट्वीटर अकाउंट हॅक झालं आहे. कृपया आज माझ्या प्रोफाईलवर येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला क्लीक करु नका...संवाद साधू नका..जोपर्यंत समस्येचं निवारण होत नाही. सध्या त्या संबधित काम सुरु आहे. आपल्याला समस्या सोडवली की  सूचित करण्यात येईल''.



अद्याप मनोज वायपेयीच्या ट्वीटर अकाउंटवर कोणतीही चुकीची गोष्ट घडल्याचं समोर आलेलं नाही. ज्या पोस्ट दिसत आहेत त्या गुरुवार पर्यंतच्या आहेत. यातील एक पोस्ट रिट्वीट केली आहे. ज्यामध्ये मनोज वाजपेयीनं जॉन अब्राहमसोबतच्या त्याच्या 'सत्यमेव जयते २' सिनेमाला पाहण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. आणि त्यातली दुसरी पोस्ट दिल्ली वाढलेल्या थंडीच्या तापमाना संदर्भात आहे. तसंच,या गुरुवारच्या पोस्टमध्ये चाहत्यांनी मनोजच्या टाइमलाइनवर त्याच्या आधीच्या कामाची प्रशंसा केलेले रीट्वीट दिसत आहेत.मनोज वाजपेयी सध्या ५२ व्या इटरनॅशनल फिल्म फॅस्टिवल रॉटरडॅम मध्ये पार पडणाऱ्या आपल्या 'जोराम' सिनेमाच्या प्रीमियरच्या प्रतिक्षेत आहे. 'जोराम' सिनेमाचं दिग्दर्शन देवाशीष मखीजानं केलं आहे. हा सिनेमा थ्रीलर आहे. या सिनेमात मनोज वाजपेयी सोबत तनिष्ठा मुखर्जी,स्मिता तांबे, मेघा माथुर,राजश्री देशपांडे सारखे कलाकारही आपल्याला दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने