किरीट सोमय्या म्हाडाचा मुकादम आहे का? अनिल परब यांचा सवाल

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला होता.यावर आज पत्रकार परिषद घेत अनिल परब यांनी स्पष्ट केले. तसेच किरीट सोमय्या म्हाडाचा मुकादम आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या वांद्रयात झालेल्या पाडकामाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहे. सोमय्या यांच्या भूमिकेवर परब आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमय्या यांनी नारायण राणे यांची पाडकाम पाहायला जावं. इकडे आला तर तुमचं स्वागत करु. मी एक शिवसैनिक आहे. सोमय्या म्हाडाचा मुकादम आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.



काय म्हणाले परब?

१९६० पासून इमारतीचा रहिवासी आहे. मी या या बिल्डिंगमध्ये माझं लहानपण गेलं मी मोठा झालो. सोसायटीच्या परवानगीनेच मी कार्यालय सुरु केलं आहे. रहिवाशांच्या विनंतीवरुन माझं जनसंपर्क कार्यालय सोसायटीत ठेवलं. जागेबाबत म्हाडासोबतही जागा मुळात एलआयसीची आहे. हायकोर्टाच्या सुचनेनुसार ही जागा नियमित करण्यासाठी रहिवाश्यांनी अर्ज केला. ही जागा नियमित करता येणा्र नसल्याचे कळल्याने मोकळी केली. मी म्हाडाला पत्रदेखील लिहिलं आहे.जागा नियमित न करण्यासाठी सोमय्यांनी दबाव आणला आहे. असा आरोप परब यांनी केला. या खेळीला भाजपचा पाठिंबा आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. बिल्डरकडून सुपारी घेऊन सोमय्यांची ही खेळी आहे.

म्हाडाच्या रहिवाशांसोबत चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरवणार. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कार्यालयाची पाहणी करण्यासाठी सौमय्यांनी यावं आम्ही त्यांचे स्वागत करतो. आता मी रस्त्यावर उभा आहे. मी एक शिवसैनिक आहे. असे आव्हान परब यांनी सौमय्यांना दिलं आहे. आम्ही पक्ष बदलण्यासाठी हा दबाव टाकला जातोय. आधी मंत्री असताना बंधनं होती.किरीट सोमय्या वांद्रयात झालेल्या पाडकामाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहे. सोमय्या यांच्या भूमिकेवर परब आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमय्या यांनी नारायण राणे यांची पाडकाम पाहायला जावं. इकडे आला तर तुमचं स्वागत करु. मी एक शिवसैनिक आहे. सोमय्या म्हाडाचा मुकादम आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने