Apple ने भारतात लाँच केले MacBook Pro, Mac Mini, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या

मुंबई: अ‍ॅपलने आपले नवे प्रॉडक्ट्स भारतात लाँच केले आहेत. कंपनीने १४ इंच आणि १६ इंच स्क्रीन साइजचे MacBook Pro लाँच केलं आहे. त्यात M2 Pro आणि M2 Max चिपसेट सोबत येतं. यासोबतच अ‍ॅपलने Mac Mini पण लाँच केलं आहे. यात M2 Pro आणि M2 चिपसेट आहे.हे नवे प्रोसेसर आहेत. जे अ‍ॅपल प्रॉडक्टची एफीशिएंसी, परफॉर्मंस आणि बॅटरी लाइफला बूस्ट करू शकतात. कंपनीच्या म्हण्यानुसार ते M2 Pro आणि M2 Max चिपसेट सोबत आलेलं नवीन MacBook Pro मॉडेल इंटेल बेस्ड MacBook Pro च्या ६ पाट फास्ट आहे. भारतीय बाजारात याची किंमत जाणून घेऊ.




किंमत किती?

  • MacBook Proच्या १४ इंचच्या व्हेरियंटला १ लाख ९९ हजार ९०० रुपयांपासून सुरूवात आहे. यात M2 Pro चिपसेट आहे.

  • तेच या प्रोसेसरमध्ये १६ इंच व्हेरिएंटची किंमत २ लाख ४९ हजार ९०० रुपये आहे. यात M2 Max चिपसेट आहे.

  • १४ इंच स्क्रीन साइजच्या MacBook Pro ला ३ लाख ९ हजार ९०० रुपये किंमत आहे.

  • १६ इंचचे ३ लाख ४९ हजार ९०० रुपये किंमत आहे. यात ग्रे, सिल्व्हर रंग आहेत.

  • M2 चिपचे Mac Mini ची किंमत ५९ हजार ९०० रुपये आहे,

  • M2 Pro प्रोसेसरची १ लाख २९ हजार ९०० रुपये किंमत आहे.

  • हे डिव्हाइस १४ जानेवारीपासून होणार उपलब्ध.

काय आहे खास?

अ‍ॅपलने MacBook Pro ला दोन चिपसेट, दोन स्क्रीन साइज आणि दोन रंगांमध्ये लाँच केलं आहे.

कंपनीनुसार यात यूझरला २२ तासांचं बॅटरी लाइफ मिळेल.

नव्या MacBook Proमध्ये WiFi 6E चा सपोर्ट मिळेल. दोन्ही ही मॉडेल्समध्ये Liquid Retine XDR डिस्प्ले दिला गेला आहे.

लॅपटॉप 1080p Face Time Hd कॅमेरा, ६ स्पीकर साउंड सिस्टीम आणि स्टूडिओ क्वालिटी माइक मिळतो.

डिव्हाइस macOS Ventura वर काम करतं. जे डेस्क व्ह्यू, सेंटर स्टेज, स्टूडिओ लाइट असे बरेच फीचर्स आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने