सत्तारांच्या बारामती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, आम्ही...

बारामती : अब्दुल सत्तार आज बारामती दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे बारकाईने पाहिले जात आहे.दरम्यान, सत्तांरांच्या बारामती दौऱ्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, जे कोणी बारामतीमध्ये येतात त्यांचे स्वागत आहे. कारण आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार झाले आहेत त्यामुळे जे येतील त्यांचे स्वागत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, राज्यातील एकनाथ आणि देवेंद्र म्हणजे ED सरकार आहे. या सरकारमध्ये केवळ सामान्या व्यक्ती भरडला जातोय.यावेळी त्यांनी नाशिक आणि नागपूर शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत भाष्य केले. याबाबत महविकास आघाडीमध्ये चर्चा होईल. आमची अंतरिम चर्चा होईल वरिष्ठ नेते भेटतील असे म्हणत महविकास आघाडी कधीही गॉसिप करत नाही.



आमच्याबाबत बोललल्याशिवाय बातमी होत नाही

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार शंभुराज देसाईंच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे पार्थ पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू असून, या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.या भेटीवर बोलताना सुळे म्हणाल्या की, आमच्या घराबाबत बोलल्याशिवाय कोणती बातमी होत नाही. त्यामुळे आमच्या बद्दल जे कोणी बोलत असतील तर ते ऐकून घेण्यास आम्ही दिलदार आहोत.

मोदींची काळजी वाटते

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ग्राम पंचायत असो किंवा संसद निवडणूक मोदीजींना सर्वत्र ठिकाणी पळायला लागतं, त्यांची ही धावपळ पाहून मला त्यांची काळजी वाटते असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.सध्या भाजपजवळ नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती आता ती दिसत नसल्याचेही त्या म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने