उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादीची भूमिका केली स्पष्ट

मुंबईः आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुंबई महानगरपालिका आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांसंदर्भात चर्चा होईल. त्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली आहे.अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यामुळे आम्हाला नाराज होण्याचा काहीच प्रश्न नाही. आम्ही ठाकरे गटासोबतच आहोत. येणाऱ्या बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरे गटासोबत जाण्याची आमची मानसिकता असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.



मागील सहा महिन्यामध्ये परिस्थिती बदलल्याचं अजित पवार सांगायला विसरले नाहीत. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक, बीएमसी निवडणूक आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.आघाडीबाबतचा पक्षांतर्गत निर्णय झालेला आहे. आता आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेण्यात येईल, असं पवार म्हणाले. अंतिम निर्णय पक्षातील वरिष्ठ घेतील, असंही त्यांनी नमूद केलं.दरम्यान, काल प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंचा गट यांची युती झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्ष नाराज असल्याचं बोललं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने