स्वागत आहे! सिसोदियांच्या कार्यालयावर पुन्हा सीबीआयची छापेमारी

दिल्ली:  दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर पुन्हा छापा टाकला आहे. उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित प्रकरणात ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.याआधीदेखील सीबीआयने टाकलेल्या छापेमारीत काहीच हाती लागले नव्हते आणि आताही काहीच हाती लागणार नाही, असा दावा सिसोदियांनी केला आहे.



सीबीआयच्या कारवाईनंतर सिसोदियांनी ट्वीट केले आहे. ज्यात ते म्हणतात की, “आज पुन्हा सीबीआय माझ्या कार्यालयात पोहोचली आहे. त्याचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर छापा टाकला, माझ्या ऑफिसवर छापा टाकला, माझ्या लॉकरची झडती घेतली, मात्र माझ्या विरोधात काहीही सापडले नाही आणि सापडणार नाही. कारण मी काहीही चुकीचे केलेले नाही. तर दिल्लीतील मुलांच्या शिक्षणासाठी मनापासून काम केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने