विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ! राज्यातल्या 'या' शाळांना सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र

पुणेः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची खेळण्याचं काम व्यवस्थेतले काही लबाड लांडगे करीत आहेत. राज्यातल्या पाच शाळांना सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र देण्याचा प्रकार घडला असल्याची धक्कादायक माहिती आहे.बोगस सीबीएसई शाळा घोटाळा प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. राज्यातील पाच शाळांना CBSE चे बोगस प्रमाणपत्र देण्यात आले आहे.पुण्यातील तीन आणि मुंबईतील दोन शाळांचा यामध्ये समावेश आहे.शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण उपसंचालक यांना यासंदर्भातील अहवाल आहे. शिक्षण उपसंचालक यांच्याकडून मंत्रालयात अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर संबंधीत प्रकरणी दोषींवर कारवाई होईल.



दरम्यान, शिक्षण विभागाकडून राज्यभरातील ६६६ सीबीएसई शाळांची चौकशी आहे. पाच शाळांचे NOC आदेश बनावट असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली असून NOC बनावट असेल तर त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.क्रिएटिव्ह एज्युकेशनल सोसायटी पुणे संचालित पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, एमपी इंटरनॅशनल स्कूल ऑफ ज्युनिअर कॉलेज, आरआयएम एस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या तिन्ही शाळांवर या आधी कारवाई झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने