"मोदी सरकारनं रचला पुलवामा, उरी हल्ल्याचा कट"; 'या' नेत्याच्या आरोपांनी खळबळ

नवी दिल्ली : पुलवामा आणि उरी हल्ला मोदी सरकारनं घडवून आणला असा गंभीर आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख मुस्तफा कमाल यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी आरोप केला की, या हल्ल्यातील एकाही सैनिकाचा मृतदेह किंवा त्याचे फोटो समोर आलेले नाहीत. कारण हे मृत झालेले सर्व जवान अनुसुचित जाती समुदयाचे होते, असंही त्यांनी म्हटलं आहे.



मुस्तफा कमाल म्हणाले, "हे जवळपास स्पष्ट झालंय की, सन २०१६ मध्ये झालेला उरी हल्ला आणि सन २०१९ मध्ये झालेला पुलवामा हल्ल्याचं कट-कारस्थान केंद्र सरकारनं रचलं होतं. कारण या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जवानांचे पार्थिव आणि फोटोही अद्याप समोर आलेले नाहीत. जोपर्यंत यामागे कोणाचा हात होता हे समोर येत नाही तोपर्यंत सर्व बोटं सरकारच्या एजन्सीजकडेच जातात""ज्या अर्थी आपल्याला या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या ३० ते ४० जवानांचे फोटो आणि पार्थिव मिळालेले नाहीत. त्याअर्थी हे सर्वजण अनुसुचित जाती समुदयातील होते," असा खळबळजनक दावाही मुस्तफा कमाल यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने