पुढल्या 5 वर्षात 'या' टेक्नॉलॉजीने बेरोजगारी वाढणार का...?

मुंबई: चॅट जीपीटी हल्ली सगळीकडे फार चर्चेत आहे. हा शब्द तुम्ही गेल्या काही दिवसांत अनेक वेळा ऐकला असेल. तेव्हा हा शब्द तुम्हाला ते AI शी संबंधित असल्याचे समजले असेल, तर चला सोप्या शब्दात समजावून सांगूया. चॅट हे जीपीटी भाषेवर आधारित मॉडेल आहे. यावर काहीही विचारल्यास ते तुमच्याशी अगदी माणसासारखे बोलेल, त्याच्याशी बोलून तुम्हाला असे वाटेल की तुम्ही रोबोट नाही तर माणसाशी बोलत आहात. हे मॉडेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे.ते मॉडेल खास यूजर्सच्या सेवेसाठी आणले गेले होते. पण आता चर्चेत आल्यानंतर लोकांनी अनेक गोष्टींसाठी याचा वापर सुरू केला आहे. चला तर आज याबाबत आपण आणखी जाणून घेऊया.

नेमकं काय आहे GPT?

GPT हे AI चॅट बॉट प्रमाणे आहे. याला ऑनलाइन कस्टमर केअरसाठी बनवण्यात आलंय.हे आधीच अशा प्रकारे प्रशिक्षित केले गेले आहे की यात एकावेळी अनेक भाषा समजण्याची प्रक्रिया समजली जाऊ शकते.

या AI चॅट बॉट ट्रेन कसे केल्या गेले?

या चॅटबॉटला जे माहीत आहे त्याचे स्त्रोत म्हणजे पाठ्यपुस्तके, वेबसाइट्स आणि बरेच लेख. हे मॉडेल या माहितीच्या आधारावर मानवास उत्तर देण्यास सज्ज आहे.




चॅट GPT ची वैशिष्ट्ये

यात सगळ्यात महत्वाचं फिचर म्हणजे मानवास रिस्पाँड करणे. त्यामुळे हे चॅटबॉट्स, AI सिस्टिम कन्वरसेशन आणि वर्चुअल असिस्टंटसाठी बेस्ट आहे. GPT हे अगदी मानवासोबत संभाषण करत असल्याप्रमाणेच तुमच्याशी भाष्य करते.विशेष म्हणजे मानवास रिस्पाँड करणे, स्टोरीज लिहीणे. कविता लिहीणे, कोड लिहीणे, आर्टिकल्स लिहीणे, ट्रान्सलेशन करणे इत्यादी कामे तुम्ही यातून करू शकता.

GPT कसे काम करते?

GPT चा वापर करण्यासाठी तुम्हाला या 4 स्टेप्स फॉलो कराव्या लागतील

  • ब्राउझरमध्ये लॉगिन पेजवर जा.

  • एआय अकउंट तयार करा आणि साइन अप करा.

  • त्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी नंबर विचारला जाईल.

  • त्यानंतर मोबाईलवर कोड येईल. त्याच्या एसएमएसवरही शुल्क आकारले जाऊ शकते.

  • SMS अॅक्टिववर जा. नोंदणी करा आणि लॉग इन करा.

  • वरच्या उजवीकडे शिल्लक असलेल्या रिचार्जच्या पर्यायावर जा.

  • रिचार्ज करा आणि सर्च बॉक्समध्ये AI सर्व्हिस शोधा.

  • शॉपिंग कार्ट बटण दाबा. तिथे तुमच्या मोबाईल नंबरचा नेशन कोड असेल.

  • तो मोबाईल नंबर कॉपी करा आणि चॅट GPT मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन सेक्शनमधे एंटर करा. 

  • तुम्हाला एक कोड मिळेल जो तुमचा व्हेरिफिकेशन कोड असेल. ओपन एआय बॉक्समध्ये हा कोड एंटर करा.

  • आता तुम्ही रेजिस्ट्रेशन का केलं याचे कारण निवडा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने