काँग्रेसच्या भूमिकेने सत्यजीत तांबेंचा मार्ग खडतर; पटोले म्हणाले, पाठिंबा...

मुंबई : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी विद्यमान सुधीर तांबे यांनी माघार घेऊन ए.बी. फॉर्म अभावी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया आली आहे. नाना पटोले यांनी स्पष्टपणे सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्याचं म्हटलं. तसेच विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा त्यांना पाठिंबा नसल्याचं म्हटलं आहे. तसेच पुढील निर्णय हायकमान घेईळ, असही ते म्हणाले. 






त्यामुळे सत्यजीत यांचा मार्ग खडतर झाला आहे. मात्र त्याचवेळी सत्यजीत यांना भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.दरम्यान सत्यजीत तांबे यांनी आपण अजुनही काँग्रेसमध्येच असल्याचं म्हटलं होतं. शिवाय आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असून सर्वांच्या भेटी घेणार असल्याचं नमूद केलं होतं. तसेच भाजपच्या नेत्यांना देखील विनंती करणार असल्याचं नमूद केलं होतं. तेव्हापासून सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने