चीन, जपाननंतर आता दक्षिण कोरियातही कोरोनाचा उद्रेक; जगभरात विषाणूची झपाट्यानं वाढ

सियोल : जगभरात पुन्हा कोरोना विषाणूनं डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा द्रेक पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियातही कोरोनाचा मोठा प्रमाणात फैलाव सुरु आहे.आज (रविवार) दक्षिण कोरियामध्ये सलग पाचव्या दिवशी कोविड-19 ची नवीन प्रकरणं कमी झाली. परंतु, गंभीर आजारी रुग्णांची संख्या जवळपास आठ महिन्यांत सर्वाधिक झालीये. देशात आतापर्यंत 57,527 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.



देशानं 57,527 नवीन कोरोना संसर्गाची पुष्टी केलीये. यात परदेशातील 110 जणांचा समावेश आहे. देशातली एकूण संख्या 29,116,800 वर पोहोचली आहे. योनहाप वृत्तसंस्थेनं कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक एजन्सीच्या (KDCA) हवाल्यानं ही माहिती दिली आहे.KDCA नुसार, देशात आतापर्यंत 63 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 32,219 झाली आहे. तर, मृत्यू दर 0.11 टक्के आहे. याशिवाय, गंभीर आजारी रुग्णांची संख्या आदल्या दिवशी 557 वरून 636 वर पोहोचलीये.अमेरिकेतही कोरोनाची दहशत CDC नुसार, कोविड-19 XBB.1.5 चा नवीन प्रकार यूएसमध्ये 40 टक्क्यांपर्यंत पसरला आहे. त्यामुळं रुग्णालयातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. BQ आणि XBB च्या प्रकारांपेक्षा हा प्रकार संसर्ग पसरवण्यासाठी अधिक धोकादायक ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने