अजय देवगणचा पुतण्या हिरो तर रवीना टंडनची मुलगी हिरोईन! स्टार किड्स पदार्पणासाठी सज्ज

मुंबई: नव्वदचं दशक गाजवणारी रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रीपैकीं एक आहे. तिच्या चित्रपट अभिनयाचे अजूनही चाहते घायाळ आहे. सध्या मनोरंजन रविना जास्त सक्रिय नसली तरी तिच्या भुमिकेने ती चाहत्याचं लक्ष आकर्षित करते. मात्र आता रविनाची मुलीनेही बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कंबर कसली आहे.दिग्दर्शक अभिषेक कपूरचा आगामी अॅक्शन अॅडव्हेंचर चित्रपटतून रवीना टंडनची मुलगी राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इतकच नाही तर अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणचीही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री होत आहे. त्यासोबतच अजय देवगणही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात राशा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



चंदीगढ करे आशिकी' नंतर चित्रपट निर्माता अभिषेक कपूरने रवीना टंडनची मुलगी राशाला आपल्या नवीन चित्रपटासाठी साइन केले असल्याचा दावा करण्यात येत आहे. चित्रपटाचं शूटिंग या वर्षीच्या उन्हाळ्यात सुरू होणार असल्याचही सांगण्यात येत आहे.चित्रपटाच्या कथेबद्दल अजून काही माहिती आली नसली तरी या चित्रपटातून अभिषेक बॉलीवूडचे दोन मोठे स्टार किड्स राशा टंडन आणि अमन देवगणला लाँच करणार असल्याचं बोलले जात आहे. आता सर्वांच्या नजरा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राशावर आहेत. अमन देवगण आणि राशा यांची ही नवीन आणि सुंदर जोडी या वर्षातील मोस्ट अवेटेड लॉन्चिंग म्हणून बोलली जात आहे.अभिषेक कपूरचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान कौतुकास्पद आहे. त्याने सुशांत सिंग राजपूत, फरहान अख्तर, राजकुमार राव, सारा अली खान आणि इतर अनेकांच टॅलेंन्ट ओळखलं आणि त्यांना लॉन्च केले. अशा परिस्थितीत आता रवीनाची लाडकी मुलगी राशा हिचे पदार्पण जोरदार होणार असल्याची चर्चा चाहत्यांना आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने