ओडिशात चाललंय काय? पुतीन यांच्या देशातील आणखी एका नागरिकाचा मृत्यू, जहाजात सापडला मृतदेह

ओडिशा:  ओडिशात  रशियन नागरिक मृतावस्थेत सापडण्याची प्रक्रिया थांबताना दिसत नाहीये. बी व्लादिमीर आणि पॉवेल अँथमनंतर आता आणखी एक रशियन नागरिक मृतावस्थेत सापडलाय.त्याचा मृतदेह जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप बंदरातल्या जहाजात सापडला आहे. एकीकडं रायगड येथील साई इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलेल्या चार पर्यटकांपैकी दोघांच्या मृत्यूचं गूढ अद्याप उकललेलं नाही, तर दुसरीकडं राज्यात आणखी एका रशियन नागरिकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आज (मंगळवार) पहाटे ही घटना घडलीये. याकूब सर्जल असं मृत नागरिकाचं नाव असून तो जहाजाचा मुख्य अभियंता होता.



पारादीप पोर्टमध्ये असलेल्या जहाजात या रशियन नागरिकाचा मृत्यू झाला आहे. मृत रशियन नागरिक जहाजावर मुख्य अभियंता म्हणून काम करत होता. रशियन अभियंता याकुबच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. परंतु, रशियन नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. यावर बंदर प्रशासनानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.काल रात्री उशिरा या रशियन नागरिकाचा मृत्यू झाल्याचं पारादीप बंदराचे अध्यक्ष पीएल हरनाड यांनी सांगितलं. या रशियन अभियंत्याचा मृत्यू कशामुळं झाला हे या घटनेच्या तपासानंतर समजेल. विशेष म्हणजे, याआधी ओडिशातील रायगडामध्ये दोन रशियन नागरिकांचा मृत्यू झाला होता. 

22 रोजी रायगड येथील हॉटेलमध्ये थांबलेले रशियन पर्यटक व्लादिमीर बिदानोव्ह यांचा हॉटेलच्या खोलीत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला.यानंतर रायगड पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं अंतिम संस्कारासाठी रशियन राजदूताशी संपर्क साधला. व्लादिमीरचा मुलगा भारतात येण्याची शक्यता नसल्यामुळं रशियाच्या राजदूताच्या संमतीनं मृतदेहाचं शवविच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यात आले.त्यानंतर 24 तारखेला आणखी एका रशियन पर्यटकाचा मृत्यू झाला. 65 वर्षीय पावेल अँटोनोव्ह असं मृताचं नाव आहे. काही काळापूर्वी त्याचा मित्र व्लादिमीर बिदानोव्हचा मृत्यू आणि त्यानंतर 24 तारखेच्या संध्याकाळी पावेल अँटोनोव्हच्या मृत्यूनं जिल्हा पोलीस आणि राज्य प्रशासन चिंताग्रस्त झालं. दोन मित्र एकत्र भारतात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने