'परीक्षेला तुम्ही 2 वेळा बसू शकता'; शिक्षणमंत्र्यांचा पालकांसह विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला

मुंबई: बारावीच्या परीक्षांची (तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीची परीक्षा मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 मार्च 2023 या काळात होणार आहे. यादरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर  यांनी पालकांसह विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.केसरकर म्हणाले, 'बीडसारख्या शहरात परीक्षांच्या तणावामुळं विद्यार्थ्यांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. यात आता पालकांनी लक्ष घालायला हवं. 'परीक्षेला तुम्ही 2 वेळा बसू शकता' हे पालकांनी मुलांना समजून सांगायला हवं.'जवाहरलाल नेहरूंनंतर मुलांवर प्रेम करणारे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आपल्याला मिळाले, हे आपलं भाग्य आहे. मातृभाषेत शिकायला मिळणार असून हे नवीन शिक्षण धोरणात येणार आहे. कुठल्याही विद्यार्थ्याला अडचण असेल तर त्यांनी पालक अथवा आमच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन करत केसरकरांनी 10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.






बीडमध्ये 30 विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन

बीडमध्ये गेल्या वर्षभरात 18 वर्षाखालील तब्बल 30 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवल आहे. त्यामुळं आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपलं मूल दडपणाखाली तर येत नाही ना? हे देखील पालकांनी पाहणं गरजेचं आहे, अन्यथा मानसिक तणावातून खचलेली मुलं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं चिंताजनक वास्तव समोर आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने