इलॉन मस्क भाऊ! संपत्ती गेली तरी केला मोठा रेकॉर्ड

अमेरिका : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणारे टेस्ला आणि स्पेसेक्सचे सीईओ इलॉन मस्क यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. इलॉन मस्क यांनी सर्वाधिक संपत्ती गमावण्याचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे.इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटर खरेदी केल्यापासून त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये सातत्याने घट झाली आहे. परिणामी मस्कने आता वैयक्तिकरित्या सर्वाधिक नुकसान सहन करण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे.गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून शुक्रवारी सांगितले आले आहे की, इलॉन मस्क यांनी इतिहासात वैयक्तिक मालमत्तेचे सर्वात मोठे नुकसान सहन करण्याचा जागतिक विक्रम केला आहे.



मस्क यांनी नोव्हेंबर 2021 पासून सुमारे 182 अब्ज डॉलर गमावले आहेत परंतु इतर संस्थाकडून हा आकडा 200 बिलियन डॉलरच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे, "इलॉन मस्कच्या नुकसानीचा अचूक आकडा निश्चित करणे जवळजवळ अशक्य आहे, परंतु मस्कच्या एकूण तोट्याने २००० मध्ये जपानी टेक गुंतवणूकदार मासायोशी सोनच्या ५८.६ बिलियन डॉलरच्या नुकसानीच्या मागील रेकॉर्डला मागे टाकले आहे."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने