काहीना मी आवडलो नाही, मला माफ करा! बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकरची भावूक पोस्ट

मुंबई:  गेली काही दिवस ज्या खेळाने आपले लक्ष वेधले होते, त्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता आपल्याला मिळाला. 100 दिवस मनोरंजन, बुद्धी, टास्क, मेहनत या साऱ्याची जोड देऊन अक्षय केळकरने या खेळात बाजी मारली. अक्षय पहिल्या पासूनच या खेळात मास्टर माइंड म्हणून ओळखला गेला. त्याच्या विजयाने अनेकांना मोठा आनंद झाला. पण या विजयानंतर त्याने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

अक्षयने या खेळासाठी यासाठी प्रचंड मेहनत घेतली, खूप हुशारीने तो खेळला. त्याने कधी कुणाची मनं दुखावली नाहीत. तो कायम सगळ्यांशी जुळवून घेत राहीला. मात्र जे पटले नाही त्याला विरोधही केला. त्यामुळे अक्षयचा स्वभाव आणि खेळ पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना आवडला. त्याच्या खेळाच्या पद्धतीमुळेच त्याला सगळे मास्टर माइंड म्हणून लागले. अगदी बिग बॉसनेही 'शिकारी', 'जादूगर' अशा शब्दात अक्षयचे कौतुक केले होते. अखेर आपल्या शांत स्वभावाच्या आणि युक्तीच्या जोरावर त्याने ही जेतेपद मिळवले.आता अक्षयने एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात तो म्हणतो, ''नमस्कार मित्रांनो.. सगळ्यात आधी तुम्ही मला जे "क.मा.ल" प्रेम देत आहात त्यासाठी खूप जास्त Thank You.. तुमच्या सगळ्या मेसेजेस ना reply देऊ शकलो नाही. आणि सगळ्या stories सुद्धा repost करू शकलो नाही.



फोन कॉल अजूनही थांबत नाहीयेत आणि तुमचं हे इतकं जास्त प्रेम मला मिळालं त्यासाठी आता काय आणि कोणत्या शब्दात माझे ऋण व्यक्त करू खरंच समजत नाहीये. पण माझ्या संपूर्ण 100 दिवसांच्या प्रवासात जस मला समजून घेतलंत, तसं आताही समजून घ्याल याची मला खात्री आहे.''''आजवर जे काम केलं त्यातून देशातील काही भागांपर्यंत आणि काही घरापर्यंत पोचत होतो, पण आपल्या घरातली कौतुकाची थाप ही बाहेरच्या माणसाच्या कौतुकापेक्षा जास्त हवीहवीशी वाटते. आणि म्हणूनच खरतर माझ्या घरातल्या, "महाराष्ट्रातल्या" आणि "मराठी" माणसांपर्यंत पोचण्यासाठी हा लढा लढलो आणि तुमची शाबासकी 'ती '(Trophy) च्या स्वरूपात पोचली!कोणताच माणूस परिपूर्ण नसतो! मीही नाही!''

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने