मिस युनिवर्सला वर्षभरासाठी फ्री मिळतात जगातल्या 'या' 5 महागड्या सुविधा

अमेरिका : विश्वसुंदरी हा मान मिळवणं हे कदाचित अनेकांचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येक तरुणीचं हे स्वप्न पूर्णत्वास येत नाही. मात्र ज्या तरुणीला विश्वसुंदरीचा किताब मिळाला त्या तरुणीचं नशीबच पालटतं असं म्हणायला हरकत नाही. मिस युनिवर्स म्हणजेच विश्वसुंदरीला मिळणाऱ्या सुविधा तुम्हाला कळताच तुम्हीसुद्धा अवाक व्हाल. आज आपण त्याबाबत जाणून घेऊया.विश्वसुंदरी हा जगातील सर्वोच पुरस्कारामधील एक असून हा मान मिळवणाऱ्या तरुणीस जगातील सर्वात महागड्या सोईसुविधा दिल्या जातात. मिस युनिवर्स 2021 जिंकणाऱ्या हरनाझ सिंधूला 1.89 कोटींची रकमेचं बक्षिस मिळालं होतं. एवढेच नव्हे तर मिस युनिवर्स ऑर्गनायझेशनकडून तिला मोठी रक्कम देखील मिळाली होता.



मिस युनिवर्सला असतात जगातील या महागड्या सुविधा

The Swanky न्यूयॉर्क अपार्टमेंट

वृत्तानुसार, हा पुरस्कार जिंकणाऱ्याला मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये एक वर्ष राहण्याची परवानगी आहे आणि तिला मिस यूएसए सोबत हे अपार्टमेंट शेअर करावे लागेल. तिचा किराणा सामान, कपडे इत्यादी सर्व खर्च संस्थेमार्फत केला जाईल.

तज्ञांची टीम नेहमी सोबत असेल

मिस युनिव्हर्सला एक टीम देखील मिळेल ज्यात मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर, प्रोफेशनल स्टायलिस्ट, त्वचाशास्त्रज्ञ, पोषणतज्ञ, डेंटिस्ट इत्यादींचा समावेश असेल. 

मोफत प्रवास आणि विशेष प्रवेश

सुविधांची यादी इथेच संपत नाही तर मिस युनिवर्सला पार्ट्या, कॉन्सर्ट, स्क्रीनिंग आणि प्रीमियरमध्ये प्रवेश मिळेल. तिला मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनसोबत वर्षभर जगभर फिरण्याची संधी मिळेल आणि वर्षभरासाठी निवास आणि भोजन शुल्काची सगळी जबाबदारी मिस युनिवर्स ऑर्गनायझेशनची असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने