फेकन्यूज पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्सना दणका! सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं YouTube चॅनेलवर फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कारवाई केली आहे. हे चॅनेल्स फेकन्यूज अर्थव्यवस्थेचा भाग आहेत असा दावा सरकारनं केला आहे. दिशाभूल करण्यासाठी अशी चॅनेल्स खोटी माहिती, क्लिकबिट, सनसनाटी फोटोज आणि टेलिव्हिजन न्यूज अँकरचे फोटोज वापरत असल्याचा दावा PIBनं केलं आहे.



माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पीआयबी फॅक्टचेक युनिटकडून (FCU) ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सहा युट्यूब चॅनेल्स बंद करण्यात आले आहेत. हे चॅनेल्स खऱ्या बातम्या आणि खोट्या बातम्या समन्वय पद्धतीनं चालवत होते. या चॅनेल्सनं कुठल्या फेकन्यूज चालवल्या आहेत याचे सहा ट्विटर थ्रेड पीआयबीनं शेअर केले आहेत. यामध्ये १०० हून अधिक फॅक्टचेक करण्यात आलं आहे. अशा पद्धतीची ही दुसरी कारवाई पीआयबीच्या या युनिटनं केली आहे. या सर्व युट्यूब चॅनेलचे मिळून सुमारे २० लाख सबस्क्रायबर्स आहेत. तसेच त्यांचे व्हिडिओ ५१ कोटी वेळा पाहिले गेले आहेत.

कारवाई करण्यात आलेले युट्यूब चॅनेल्सनं कोणत्या फेकन्यूज पसरवल्या?

निवडणुकांमध्ये मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिन्सवर बंदी आणण्याबाबतच्या व्हिडिओमध्ये खोटी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ घटनात्मक संघटना, राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यांच्यासारख्या व्यक्तींचा दाखला देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने