"लग्नानंतर मुलीचा संपत्तीवर अधिकार नाही, ही मानसिकता चुकीची"

गुजरात: लग्नानंतर मुलीचा संपत्तीवर अधिकार नाही, ही मानसिकताच मुळात चुकीची आहे अशी टिप्पणी गुजरात हायकोर्टाने केली आहे. तसेच मुलगी किंवा बहिणीबाबत असलेली समाजाची ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही हायकोर्टाने म्हटले आहे.

लग्नानंतर मुलगी किंवा बहिणीचा अधिकार उरत नाही ही मानसिकता चुकीची

संपत्तीबाबत चाललेल्या एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, खंडपीठाने याचिकाकर्त्यांवर टिप्पणी केली की, केवळ लग्न झालं म्हणून मुलींचा संपत्तीवरील अधिकार काढून टाकता येत नाही. एकाच कुटुंबात जन्मलेल्या भावाप्रमाणेच बहिणीचाही संपत्तीवर समान अधिकार असतो. तेव्हा लग्नानंतर संपत्तीवर हक्क उरत नाही ही मानसिकता चुकीची आहे.



कौटुंबिक मालमत्ता वादावरून हायकोर्टाने ही टिप्पणी केली

सरन्यायाधीश अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती ए. शास्त्री यांची खंडपीठात कौटुंबिक मालमत्ता वाटप संदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरु होती. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत गुजरात उच्च न्यायालात याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये याचिकाकर्त्याचे म्हणणे होते की, त्यांच्या बहिणीने मालमत्तेतील अधिकार सोडला आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. त्यावर ही मानसिकताच मुळात चुकीची असल्याचे हायकोर्टाने म्हटले.

लग्नानंतरही संपत्ती मुलीची स्थिती मुलाप्रमाणेच असेल

पुढे न्यायाधीश याचिकाकर्त्यांना म्हणाले की, मुलगा विवाहित किंवा अविवाहित राहिला तर कायद्याने मुलाची कुटुंबातील स्थिती आणि संपत्तीवरील अधिकारात बदल होत नसेल, तर मुलगी विवाहित आहे की,अविवाहित यावरून मुलीच्या अधिकारामध्येही बदल होत नाही. मुलीची परिस्थितीही बदलणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने