प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत लढलो तर २०० पेक्षा जास्त जागा जिंकू

मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर युती केली आहे. यामुळे ठाकरे गटाला भिम शक्तीचा फायदा होवू शकतो.प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत लढण्याबाबत सुचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, "ठाकरे गट-वंचित आघाडी एकत्र लढल्यास विधानसभेच्या १५० जागा येतील असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हे केलं आहे.


तर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आल्यास २०० पेक्षा जास्त जागा येतील. एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सोबत बोलणार आहेत. तर पुढं म्हणाले आमची आणि ठाकरे गटाशी युती झाली आहे.पण अद्याप आम्ही महाविकास आघाडीचा भाग नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील सभेत केला आहे. यावेळी आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा भाग होण्यासाठी सकारात्मकता दाखविली आहे. असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने