शरद पवारांच्या शब्दाला काँग्रेसने डावललं?

मुंबई : राज्याचं राजकारण तापलेलं असतानाच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस स्वबळावर निवडून येऊ शकतो अशी स्थिती महाराष्ट्रात आहे, असं वक्तव्य करुन प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. काही दिवसापूर्वी आगामी निवडणुका एकत्र लढण्यासंदर्भात कोणतीही अडचण नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हंटलं होतं.दरम्यान नाना पटोले यांनी पुन्हा स्वबळाची भाषा करत आम्ही जनतेच्या अपेक्षेत खरे उतरु, असे ते म्हणाले आहेत. पटोले यांच्या या विधानामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 


मराठवाडा, विदर्भासह कोकणामध्येही काँग्रेसचा आमदार निवडून येऊ शकतो, असे नाना पटोले म्हणाले आहेत.पवारांसारखे जे काँग्रेस सोडून गेले त्यांनाही आता काँग्रेस संपणार नाही, असं वाटत आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीची चर्चा बैठकीत होईल. अमरावती आणि नागपूरची जागा महविकास आघाडी शिक्षण मतदार संघात लढवणार आहोत. आमची तयारी सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवू असं राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होत. 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्र तयारी करत आहेत, असं पवार म्हणाले होते. पण आता पटोले यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने