प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण का होत नाही? संविधानात दडलं आहे कारण

दिल्ली: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या यंदा राजपथावर देशाचा झेंडा फडकवतील. प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्याची रौनक, राजपथावरच्या परेड आणि या राष्ट्रीय सणाची शानच काही और असते असे म्हणायला हरकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की, प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण होत नाही. याचं उत्तर आपल्या संविधानातच आहे.२६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी देशभारात ध्वज फडकवला जातो. तर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केलं जातं. यातला नेमका फरक आपल्याला माहित नसतो. ध्वजाच्या पोझीशनवर त्याचे रोहण होणार की, फडकवला जाणार हे समजत असतं.




राष्ट्रीय ध्वजाची पोझिशन?

प्रजासत्ताकदिनाला (२६ जानेवारी ) ध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो. त्यानंतर ध्वज केवळ फडकवला जातो. देश आधीच स्वतंत्र असल्याचा संकेत म्हणून ही कृती केली जाते.स्वातंत्र्यदिनाला (१५ ऑगस्ट) तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूस बांधला जातो. नंतर पंतप्रधान ध्वजाला दोरीने वर नेत मग फडकवतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सन्मानार्थ ध्वजारोहण केले जाते.

हा सोहळा कोणत्या ठिकाणी केला जातो ?

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजपथावर होता व राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकवतात. तर स्वातंत्र्यादिनाला ध्वजारोहण लाल किल्यावर होते व पंतप्रधान लाल किल्याच्या तटबंदीवरून जनतेला संबोधित करतात.

सोहळा कसा असतो?

तर प्रजासत्ताक दिनाला भारतीय सुरक्षादलाच्या तीनही दलांची परेड होते. तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेशांची राजपथावर परेड होते.स्वातंत्र्यादिनाला ध्वजारोहण लाल किल्यावर होते व पंतप्रधान लाल किल्याच्या तटबंदीवरून जनतेला संबोधित करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने