अर्थसंकल्पाला बजेट का म्हणतात? फ्रेंच इतिहासात दडलंय खास कारण

दिल्ली: निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला देशासमोर २०२३ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.आता असे काही प्रश्न आहेत जे नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात येतात, जसं की अर्थसंकल्प नेमका काय प्रकार असतो? अर्थसंकल्पात काय असतं? अर्थसंकल्प का सादर केला जातो? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्थसंकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्प का म्हणतात?

तर अर्थसंकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्प किंवा युनियन बजेट म्हंटल जातं कारण...

बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये सर्वप्रथम १७३३ मध्ये वापरण्यात आला. भारताची सत्ता जेव्हा इस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली, त्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६० रोजी जेम्स विल्सन याने मांडला.स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील लियाकत अली खान यांनी १९४७-४८चा अर्थसंकल्प मांडला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्तमंत्री आर. के. शण्मुखम शेट्टी यांनी स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडला.तसं पाहायला गेलं तर, 'बजेट' हा शब्द फ्रेंच शब्द Bougette पासून आलाय. याचा अर्थ आहे चामड्याची ब्रीफकेस.पूर्वी अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करण्यासाठी चामड्याची बॅग वापरायचे. 2019 मध्ये, जेव्हा सीतारामन यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला तेव्हा त्यांनी बजेट ब्रीफकेसच्या ऐवजी खात्याची वही आणली.




केंद्रीय अर्थसंकल्पाचं महत्व..

केंद्रीय अर्थसंकल्प हा केवळ लेखा दस्तऐवजापेक्षा बरच काही आहे. हे सरकारच्या व्यापक धोरणाची स्थिती दाखवतो आणि आर्थिक सुधारणांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो.आपल्या देशात सामाजिक न्याय आणि समानतेसह जलद आणि संतुलित आर्थिक विकास घडवून आणणं हे केंद्रीय अर्थसंकल्पाचे सर्वसाधारण उद्दिष्ट असतं.संसाधनांचे कार्यक्षम वाटप, बेरोजगारी आणि गरिबी कमी करणे, संपत्ती आणि उत्पन्नाची असमानता कमी करणे, किमती नियंत्रित करणे आणि कर रचना बदलणे हे उद्दिष्ट असतं.कलम ११२-११७ नुसार खर्चाचा कोणताही प्रस्ताव आणि अनुदानाची मागणी राष्ट्रपतींच्या शिफारशीद्वारे करता येते.भारतीय राज्यघटनेच्या कलम ११२ नुसार, लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणे ही राष्ट्रपतींची जबाबदारी आहे.

अनुच्छेद ७७ (३) नुसार, केंद्रीय अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्प तयार करण्यासाठी जबाबदार धरलं जातं. ज्याला वार्षिक वित्तीय विवरण देखील म्हटले जाते आणि ते संसदेद्वारे आयोजित केले जाते.मंत्रालये, संस्था, केंद्रशासित प्रदेश आणि राज्ये एकत्रितपणे योजना तयार करतात आणि त्या अर्थमंत्र्यांकडे सादर करतात, जे संपूर्ण विचारविमर्शानंतर संसदेत सादर करतात.

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जॉन मथाई हे दुसरे अर्थमंत्री बनले. १९४९-५० आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला होता. संसदेत हल्ली अर्थमंत्री जवळजवळ दोन तासांचे लांबलचक भाषण वाचन करतात.त्याकाळात मथाई यांनी संपूर्ण अर्थसंकल्पाचे वाचन न करता अर्थसंकल्पातील काही खास मुद्द्यांचेच संसदेत वाचन केले होते. या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच योजना आयोग आणि पंचवार्षिक योजनांचादेखील उल्लेख करण्यात आला मथाई यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाची ही विशेष बाब होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने