कधी होणार आहे या वर्षीचा मेट गाला फॅशन इव्हेंट? जाणून घ्या थीम आणि ड्रेस कोड

न्यूयॉर्क: फॅशन जगतातील सर्वात खास आणि सर्वात मोठा फॅशन इव्हेंट मेट गाला 1 मे रोजी होणार आहे. हा कार्यक्रम अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये होणार आहे.विशेष म्हणजे या कार्यक्रमात फॅशन डिझायनर्सपासून ते गायक आणि फिल्म स्टार्सही सहभागी होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात मेट गालाच्या थीम आणि त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल...




मेट गाला म्हणजे काय?

मेट गाला कॉस्च्युम इन्स्टिट्यूट बेनिफिट किंवा मेट बॉल म्हणूनही ओळखला जातो. हा कार्यक्रम दरवर्षी वसंत ऋतूच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित केला जातो. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे हा एक चॅरिटी इव्हेंट आहे.फॅशन इंडस्ट्रीच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये, प्रत्येकजण एका थीमनुसार कपडे घालून येतो. कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व सेलिब्रिटी मोठ्या फॅशन डिझायनर्सचे कपडे परिधान करतात आणि रेड कार्पेटवर त्याचे सादरीकरण करतात.

या थीमला डिझायनर कार्ल लेजरफेल्डचे नाव दिले जाणार

यावर्षी, मेट गाला येथे प्रसिद्ध फॅशन डिझायनर कार्ल लेजरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी यांचे कॉस्च्युम इन्स्टिट्यूटचे प्रदर्शन भरवले जाणार आहे .कार्ल लेजरफेल्ड यांचे फेब्रुवारी 2019 मध्ये निधन झाले आहे . मेट गालामध्ये या फॅशन लिजेंडला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या ड्रेस कोडबद्दल बोलायचे तर, यावर्षी 'इन ऑनर ऑफ कार्ल' ही थीम ठेवण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने