भाजप गंगेसारखा पक्ष, यात डुबकी मारून पापं धुवून टाका; मुख्यमंत्र्यांची विरोधी नेत्यांना ऑफर

दिल्ली: डाव्या पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये येण्याचं आवाहन करत त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी भाजपला गंगा नदी असं संबोधलंय. याशिवाय, त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना खुली ऑफरही दिलीये.ईडी ) सीबीआयची चौकशी मागं लागल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना क्लिनचीट मिळते, असा आरोप कायम विरोधकांकडून केला जातो. या आरोपांसारखंच एक विधान खुद्द भाजप नेत्यानं केलंय. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी भाजप  हा पक्ष गंगेसारखा असून यात ड़ुबकी मारून तुमची सर्व पापं धुवून टाका, अशी खुली ऑफर त्यांनी दिलीये.



दक्षिण त्रिपुराच्या काक्रबान ) इथं जन विश्वास रॅलीत बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. ज्या लोकांचा स्टॅलिन आणि लेनीन यांच्या विचारसरणीवर विश्वास आहे. त्यांना माझं आवाहन आहे की, या भाजपमध्ये सामील व्हा. कारण, भाजप हा पक्ष गंगेसारखा आहे. या गंगेत तुम्ही डुबकी माराल तर तुमची सर्व पापं धुवून जातील, असं त्यांनी म्हटलंय.साहा पुढं म्हणाले, रेल्वेचे डबे अजूनही रिकामे आहेत. रिकाम्या डब्यांमध्ये बसा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला जिथं पोहोचायचं आहे, तिथं ते पोहोचवतील. दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यात डाव्या सरकारच्या काळात 69 विरोधी नेत्यांची हत्या झाली, असंही त्यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने