‘गोकुळ’ देणार २४३० म्हशींना अनुदान

 कोल्हापूर : जिल्ह्यात पशुधन वाढावे, तरुण शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायला चालना मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) ने जातीवंत म्हैस खरेदीसाठी तीस टक्के अनुदान दिले आहे. यामध्ये गोकुळने २४३० म्हैस खरेदी करून दिली आहे. या म्हशींसाठी ३० टक्के अनुदान दिले जाणार आहे. सध्या प्रत्येक म्हशीसाठी पाच हजार रुपये दिले आहेत. त्यानंतर उर्वरित पंचवीस हजार रुपये दिले जाणार आहेत.तरुण दूध उत्पादकांना पाठबळ देण्यासाठी ‘गोकुळ’ने घेतलेला निर्णय निश्‍चितपणे स्वागतार्ह आहे. ‘गोकुळ’च्या माध्यमातून जिल्ह्यातील १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान १३२९ व १ एप्रिल २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान ११०९ अशा एकूण २४३० म्हशी घेतल्या आहेत. 



यामध्ये सुरुवातील वाहतूक खर्च म्हणून पाच हजार रुपये दिले आहेत. त्यानंतर त्यांचे संगोपन झाल्यानंतर उर्वरित २५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. एका म्हशी मागे तीस टक्के अनुदान दिले जात असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे.दरम्यान, जिल्हा बँकेनेही गोकुळच्या माध्यमातून म्हैस घेणाऱ्या दूध उत्पादकांसाठी पाचशे कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज देण्याचे नियोजन केले आहे. अजूनही ‘गोकुळ’कडून अनुदान देण्याची प्रक्रिया केली जात आहे. ‘गोकुळ’ने दूध संकलनासाठी वीस लाख लिटरचे उद्दिष्टे घेतले आहे. त्यादृ्ष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय नवोदित दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यसाठीही याचा फायदा होत आहे.

१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ अखेर

जातीवंत म्हशीची तालुकानिहाय खरेदी

तालुका म्हैस संख्या

करवीर २९१

राधानगरी १०४

पन्हाळा/गगनबावडा ५५

शिरोळ २०७

कागल १२६

शाहूवाडी ४३

तालुका म्हैस संख्या

हातकणंगले ७३

चंदगड ५५

भुदरगड ६१

गडहिंग्लज ४९

आजरा ३४

म्हैस एकूण १०९८

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने