शरद पवारांशी शेतातील भांडणे नाहीत, आंबेडकर आणि ठाकरे युतीत चर्चा राष्ट्रवादीची

मुंबई: अखेर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अखेर वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी वंचितांची युती केवळ ठाकरे गटाशी माविआशी नाही. असे स्पष्ट करताना राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी शेतातील भांडणे नाहीत असेदेखील स्पष्ट केलं.पवारांसोबत शेतातलं भांडण नाही, मुद्यांच भांडण आहे. असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. यापूर्वीही अनेकवेळा आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत असे वक्तव्य केलं आहे.उध्दव ठाकरे यांच्या बरोबर युती करण्यासाठी राष्ट्रवादी नको, असं आबेंडकर यांनी म्हटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. दरम्यान, आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीसोबतच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं.



काय म्हणाले आंबेडकर?

निवडणुकीमध्ये एक बदलाच राजकारण सुरु झालं. गेली अनेवर्ष उपेक्षीतांच राजकारण याची सुरुवात व्हावी म्हणून सर्व प्रयत्न करण्यासाठी आम्ही चळवळ सुरु केली. जिंकून येणं हे मतदाराच्या हातामध्ये आहे. पण उमेदवारी देणं हे पक्षाच्या हातामध्ये आहे. राज्यात मुद्याच राजकारण बाजूला पडलयं.शरद पवारांची मी आज प्रतिक्रिया वाचली. आमचं दोघांच भांडण जुन आहे. शेतातलं भांडण नाही. नेतृत्वाचं भांडण नाही. दिशेच भांडण नाही. आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आमच्या युतीला स्विकारेल अशी अपेक्षा.

युतीवर काय होती शरद पवारांची भूमिका?

शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी, मला याबाबत माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे या युतीबाबत पवारांची समहती नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने