१२ वीच्या विद्यार्थ्यांना आज मिळणार हॉल तिकीट, वेबसाइटवर थेट होणार उपलब्ध

मुंबई: यंदा महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आजपासून उपलब्ध होत असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली. माहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या १२ वीची परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये होणार असून या विषयीचे ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करण्यात आलं आहे.आज सकाळी ११ वाजेपासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकीट उपलब्ध असणार आहेत. www.mahahssscboard.in या वेबसाइटवर हे हॉलतिकीट्स उपलब्ध आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.



हॉल तिकीट प्रिंट

फेब्रुवारी-मार्च २०२३साठी १२ वीच्या परीक्षेचे ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट काढून घ्यायची आहेत.

हे प्रिंट काढताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये असं मंडळाने सांगितलं आहे.

या प्रिंटवर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असं बोर्डाने नोटीसमध्ये सांगितलं आहे.

चुका किंवा बदल

हॉल तिकीटमध्ये काही चुक असल्यास प्रवेशपत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन कराव्या.हॉल तिकीटवरचा फोटो, सही, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातल्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे ताबडतोब पाठवायची, असंही सांगण्यात आलंय.

हॉल तिकीट हरवलं तर?

हॉल तिकीट विद्यार्थ्याकडून हरवलं तर संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने पुम्ही प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्याला प्रवेश द्यावा.फोटो सदोष असल्यास विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी सही शिक्का मारावा, अशाही सुचना करण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने