ईडीच्या कार्यवाईनंतर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया, म्हणाले विशिष्ट...

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर ईडीने पहिली कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता यावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया आली आहे.मुश्रीफ म्हणाले की, मी कामानिमित्त बाहेर आहे. दुरध्वनीवरून मला ईडीच्या कारवाईची माहिती मिळाली आहे. कारखाना, निवासस्थान आणि नातेवाईकांची घरे तपासण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी. तसेच कागल आणि कोल्हापूर बंद ठेवण्याची केलेली घोषणा मागे घ्यावी, असं आवाहन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.







यापूर्वी देखील अशाप्रकारचे छापे पडले होते. त्यावेळी ईडीला सर्व माहिती मिळाली होती. आज पुन्हा का छापेमारी केली हे आपल्याला ठावूक नाही. कोणत्या हेतून ही कारवाई केली हेही कळत नाही. याची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी प्रसारमाध्यमांसमोर येईल, असंही मुश्रीफ म्हणाले.दरम्यान कागलमधील एका भाजप नेत्याने दिल्लीत जावून माझ्यावर कारवाई कऱण्यासाठी प्रयत्न केले. चार दिवसांपूर्वी देखील त्यांनी सांगितलं होतं की, मुश्रीफ यांच्यावर कारवाई होईल. किरीट सोमय्या म्हणतात, अस्लम शेख यांच्यावर कारवाई होणार आहे. यावरून विशिष्ट समाजावर कारवाई केली जात असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने