टीम इंडियाकडून जपानच्या धुव्वा! 8-0 ने केला पराभव

मुंबई: हॉकी वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने जपानचा 8-0 ने धुव्वा उडवला आहे. भारतीय संघासाठी पहिला गोल मनदीप सिंगने केला. दुसऱ्या हाफमध्ये टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. दुसऱ्या हाफच्या दुसऱ्याच मिनिटाला भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला.या पेनल्टी कॉर्नरवर मनदीप सिंगने कोणतीही चूक केली नाही. यानंतर अभिषेकने भारतासाठी दुसरा गोल केला. सामन्याच्या 35व्या मिनिटाला अभिषेकने गोल केला. अशा प्रकारे टीम इंडिया 2-0 ने पुढे गेली.



मनप्रीत सिंगचे 2 गोल

मनप्रीत सिंगने भारतासाठी तिसरा गोल केला. मनप्रीत सिंगने तिसऱ्या क्वार्टरच्या 12व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. मात्र, मनप्रीत सिंगच्या शॉटवर जपानी खेळाडू जखमी झाला. तरी टीम इंडियाची आघाडी 3-0 अशी वाढवण्यात संघाला यश मिळाले.मात्र, तिसऱ्या क्वार्टरच्या 13व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, अभिषेकने इंजेक्ट केल, पण भारतीय खेळाडूंना गोल करता आला नाही. मात्र, अभिषेकने लगेचच त्याची भरपाई केली.13व्या मिनिटालाच अभिषेकने फील्ड करत भारताला सामन्यात 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. याशिवाय सामना संपण्याच्या 2 मिनिटे आधी भारताने आणखी एक गोल केला. त्याचवेळी सामना संपायला एक मिनिट बाकी असताना भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. यानंतर टीम इंडियाने सामना संपण्याच्या अवघ्या 40 सेकंद आधी 8वा गोल केला. अशा प्रकारे भारतीय संघाने जपानचा 8-0 असा सहज पराभव केला.भारत आणि जपान यांच्यातील हा सामना राउरकेला येथे खेळण्यात आला होता. पूर्वार्धात भारतीय संघाने अनेक आक्रमणे केली, अनेक वेळा गोल करण्याच्या संधी आल्या, पण गोल करण्यात यश आले नाही. वास्तविक, जपानच्या गोलरक्षकाने अनेक शानदार गोल रक्षण केले.

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन

आरपी श्रीजेश, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुरेंद्र कुमार, वरुण कुमार, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, राज कुमार पाल, शमशेर सिंग, मनदीप सिंग, सुखजित सिंग

जपानचा प्लेइंग इलेव्हन

ताकाशी योशिकावा, रेकी फुजिशिमा, शोटा यामादा, मासाकी ओहाशी, सेरेन तनाका, टिकी टाकडे, केन नागयोशी, कैटो तनाका, कोजी यामासाकी, ताकुमा निवा, र्योमा ओका

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने