भारताची ४८ वर्षांची प्रतीक्षा यंदा संपणार?

दिल्ली: भारतीय पुरुष हॉकी संघाची विश्‍वकरंडकात पदक जिंकण्याची प्रतीक्षा ४८ वर्षांनंतर संपणार का, या प्रश्‍नाचे उत्तर तमाम हॉकीप्रेमींना आजपासून भारतात सुरू होत असलेल्या स्पर्धेमध्ये मिळेल. भारतीय हॉकी संघाने १९७५मध्ये मलेशिया येथे झालेल्या विश्‍वकरंडकात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून पहिल्यांदाच जेतेपदावर मोहोर उमटवली होती. त्यानंतर आतापर्यंत भारतीय संघ पदकापासून दूर आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघासमोर उद्या होणाऱ्या सलामीच्या लढतीत स्पेनचे आव्हान असणार आहे.भारताने १९७१मध्ये स्पेन येथे झालेल्या पहिल्यावहिल्या विश्‍वकरंडकात ब्राँझपदक पटकावले होते. त्यानंतर १९७३ नेदरलँडस्‌ येथे झालेल्या विश्‍वकरंडकात भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नेदरलँडस्‌ संघाकडून भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव झाला. त्यानंतर १९७५मध्ये भारताने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यानंतर १९७८ ते २०१४ या दरम्यानच्या विश्‍वकरंडकात साखळी फेरीचा अडथळाही ओलांडता आला नाही.आम्ही सरावामध्ये विविध पयार्यांची पडताळणी केली. पिछाडीवर असल्यास कसे खेळायचे, १० खेळाडूंसह मैदानात खेळावे लागले तर कसा प्रतिकार करायचा, हा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे.



भारतीय हॉकी संघ

अभिषेक, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, जर्मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), ललित उपाध्याय, क्रिशन पाठक, नीलम संजीप सेस, पी. आर. श्रीजेश, नीलकांता शर्मा, शमशेर सिंग, वरुण कुमार, आकाशदीप सिंग, अमित रोहिदास (उपकर्णधार), विवेक सागर प्रसाद व सुखजीत सिंग.

तुल्यबळ प्रतिस्पर्धी

भारत-स्पेन यांच्यामध्ये रोमहर्षक लढत होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय संघ जागतिक मानांकनात सहाव्या, तर स्पेनचा संघ आठव्या स्थानावर आहे. तसेच या दोन देशांमध्ये आतापर्यंत झालेल्या ३० लढतींपैकी १३मध्ये भारताने विजय मिळवले असून ११मध्ये स्पेनला यशाची चव चाखली आहे. दोन देशांमधील सहा लढती अनिर्णित राहिल्या आहेत.

भारतीय संघाच्या लढती

  • १३ जानेवारी - भारत - स्पेन

  • १५ जानेवारी - भारत - इंग्लंड

  • १९ जानेवारी - भारत - वेल्स

हॉकी विश्‍वकरंडकाची गटवारी

  • अ - अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका

  • ब - बेल्जियम, जर्मनी, जपान, कोरिया

  • क - चिली, मलेशिया, नेदरलँडस्‌, न्यूझीलंड

  • ड - इंग्लंड, भारत, स्पेन, वेल्स

आजच्या लढती...

  • अर्जेंटिना - दक्षिण आफ्रिका, दुपारी १ वाजता

  • ऑस्ट्रेलिया - फ्रान्स, दुपारी ३ वाजता (या दोन्ही लढती भुवनेश्‍वरमध्ये होतील)

  • इंग्लंड - वेल्स, संध्याकाळी ५ वाजता

  • भारत - स्पेन, संध्याकाळी ७ वाजता (या दोन लढती रौरकेला येथे होतील)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने