धक्कादायक! भारतीय जवानानं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या

कोल्हापूर : सध्या भारतीय जवानांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढ असून नैराश्यातून मोठ्या प्रमाणात आत्महत्येच्या घटना घडत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील  पन्हाळा तालुक्याच्या काखे इथं असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या तरूण जवानानं आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडलीये. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात देण्यात आली. परंतु, आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नाही. सत्यजीत खुडे असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे.



पन्हाळा तालुक्यातील  सत्यजीत महादेव खुडे (वय 28) या लष्करी जवानानं राहत्या घरी दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.19) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सत्यजीत हे गुजरातमध्ये डी. रिगारमेंट या विभागात सेवा बजावत होते. यावर्षी (दि. 1) जानेवारी ते आपल्या काखे गावी सुट्टीवर आले होते. सत्यजीत यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात  झालीये.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने