राहुल गांधीकडून तिरंग्याचा अपमान? कटआऊटच्या उंचीवरून केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल

जम्मू काश्मीर: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची आज सांगता झाली आहे, याच्या एक दिवस आधी राहुल गांधी यांनी लाल चौक येथे तिरंगा फडकवला होता. या ध्वजारोहणावरून आता नवा वाद पेटला आहे. भाजपकडून राहुल गांधी यांनी ध्वज संहितेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे.लाल चौक येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत, यामध्ये राहुल कांधी यांचं कटआऊट तिरंग्याहून वर असल्याचे दिसत आङे. यावरून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी राहुल गांधी यांनी स्वतःचा कटआऊट लावून ध्वजारोहण केल्याचे म्हटले आहे.



हे राजवंशची मानसीकता दाखवतं. त्यांच्यासाठी स्वतःचा फोटो, त्यांची आजी-आजोबांचा फोटो तसेच त्यांच्या नावावर सुरू असलेल्या योजना सर्व राष्ट्रध्वजापेक्षा मोठं आहे. जर मी असं काही केलं असतं तर मला लाज वाटेल. पण मला वाटतं की घराणेशाही ही त्यांच्या डीएनएमध्ये आहे. जेव्हा तुम्ही ध्वजारोहण करता तेव्हा देखील तुम्ही त्याला खाली दाखावू इच्छीता आणि ध्वजाच्या मागे स्वतःचे कटआऊट लावून ध्वज संहितेचे उलंघन करता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने