मला लॉलीपॉप नकोय, माझा वाटा मला हवाय; JDU नेत्याचा नितीश कुमारांवर पुन्हा हल्ला

बिहार: जनता दल युनायटेडचे  नेते उपेंद्र कुशवाह यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधलाय. राजकीय वादानंतर कुशवाह यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात रणशिंग फुंकलंय.त्यांना विधानपरिषदेचा सदस्य करून लॉलीपॉप देण्यात आलं, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र मला लॉलीपॉप नको, मला माझा वाटा हवाय, असं त्यांनी सांगितलं. कुशवाह म्हणाले, 'मला अशा पदांचा लोभ नाही. मी याआधी केंद्रीय मंत्रीपद सोडलं होतं. स्वतः नितीश कुमारयांनी 1994 मध्ये लालू यादव यांच्याकडं वाटा मागितला होता, तसाच वाट मलाही हवा आहे.'



नितीश कुमार म्हणतात की, जेडीयूमध्ये आल्यानंतर मला खूप आदर दिला गेला. पण, मला पार्लमेंटरी बोर्डाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. मी संसदीय मंडळाचा अध्यक्ष झालो. त्यानंतर जेडीयूच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली. मला संसदीय मंडळाचा सदस्य होण्याचा अधिकार मिळाला नाही. निवडणुकीतील उमेदवार निवडीबाबत माझ्याकडून कोणतीही सूचना घेण्यात आली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. कुशवाहांच्या आरोपावर नितीश कुमार काय उत्तर देतात हे पहावं लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने