उगाच अथिया फिदा झाली नाही! केएल राहुलच्या धावा कमी संपत्ती मात्र वाढता वाढता वाढे

मुंबई: भारतीय संघातील अनुभवी खेळाडू आणि तीनही फॉरमॅट खेळणारा फलंदाज केएल राहुल अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत आज (दि.23 जानेवारी) लग्नगाठ बांधणार आहे. हे लग्न दोघांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवारापुरतेच मर्यादित ठेवण्यात आले आहे. मात्र तरी देखील या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.केएल राहुल - अशिया शेट्टी यांचा विवाह शाही पद्धतीने होणार असल्याचे नुकत्यात काही प्रसिद्ध झालेल्या फोटोवरून दिसत आहे. हे फोटो पाहून तुम्हा आम्हाला केएल राहुलने किती संपत्ती कमावली आहे असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. आज आपण केएल राहुलची संपत्ती किती आहे हे पाहणार आहोत.

कुठं होत आहे अथिया - राहुलचे लग्न?

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या विवाहाबद्दल दोघांच्याही चाहत्यांमध्ये खूप क्रेझ निर्माण झाला आहे. राहुल आता सुनिल शेट्टीचा जावई होणार आहे. त्यामुळे या लग्नाबाबत चाहते जास्तच उत्सुक आहेत. राहुल आणि अथियाचे लग्न हे सुनिल शेट्टीच्या खंडाळा येथील आलीशान फार्म हाऊसवर होणार आहे. या लग्नासाठी सुनिल शेट्टीने जय्यत तयारी केली आहे. संगीत, हळद यासह अनेक लग्नाचे विधी याच बंगल्यात पार पडणार आहेत.केएल राहुल हा 2014 पासून भारतीय संघाचा एक अविभाज्य घटक राहिला आहे. त्याने आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीचे नाणे खणखणीत वाजवून दाखवल्यानंतर आता लखनौ सुपर जायंट्सच्या नेतृत्वची धुरा तो आपल्या खांद्यावर वाहत आहे. केएल राहुल भारताचा स्टार क्रिकेटपटू असल्याने कमाईच्या बाबतीतही तो आघाडीवर आहे.




केएल राहुलची संपत्ती किती?

बीसीसीआयने तीनही क्रिकेट फॉरमॅटम खेळणाऱ्या केएल राहुलसोबत A ग्रेड केंद्रीय करार केला आहे. बीसीसीआयकडून त्याला वर्षाला 5 कोटी रूपये मिळतात. याचबरोबर गेल्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सने केएल राहुलला 17 कोटी रूपयाला खरेदी केले होते.केएल राहुलला बीसीसीआय आणि आयपीएल कडून मिळणाऱ्या मानधनाबरोबरच जाहिरातीतून देखील बरेच उत्पन्न मिळते. सध्या राहुलकडे PUMA, BOAT, RBI, Redbull सारख्या मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिराती आहेत. केएला राहुलची ताजे उत्पन्न हे 80 कोटी रूपये इतके असण्याची शक्यता आहे.केएल राहुल सध्या भारतीय संघातील एक महत्वाचा फलंदाज आहे. तो सलामी तसेच मधल्या फळीत देखील फलंदाजी करतोय. आता तो वनडे मध्ये विकेटकिपिंग देखील करतोय. केएल राहुलने आतापर्यंत 45 कसोटी सामन्यात 2604 धावा, 51 वनडेत 1870 धावा तर 72 टी20 सामन्यात 2265 धावा केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने