पठाणच्या यशावर कंगणा म्हणाली, 'इथे फक्त जय श्री रामचाचं नारा'

मुंबई: सध्या सर्वत्र शाहरुखच्या 'पठाण'चीच चर्चा आहे. 'पठाण' चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्याच कलाकारांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र लोकांना आश्चर्य वाटलं ते कंगणाच्या प्रतिक्रियेचं. कंगनाने नुकतेच एका कार्यक्रमात पठाणचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की, चित्रपट चांगला चालला आहे आणि असे चित्रपट सुरूच राहिले पाहिजेत.त्यानंतर कंगणाने आता तिच्या ट्विटर हँडलवर पठाणच्या यशाबद्दल एक लांबलचक नोटही लिहिली आहे. कंगनाने एकामागून एक 3 ट्विट केले आहेत. तिनं लिहिले, 'पठाण द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणाऱ्या सर्वांशी मी सहमत आहे, पण कोणाच्या द्वेषावर प्रेमाचा विजय झाला?'

कंगनाने एकामागून एक 3 ट्विट केले आहेत. कंगना म्हणाली, 'पठाण द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणाऱ्यांशी मी सहमत आहे, पण कोणाचं प्रेम आणि कोणाच्या द्वेषावर. तिकीट कोण खरेदी करत आहे आणि कोण यशस्वी करत आहे हे नीट समजून घेऊया. होय, हे भारताचे प्रेम आहे जिथे 80 टक्के हिंदू राहतात आणि तरीही चित्रपटाचे नाव पठाण आहे आणि तो यशस्वीही होत आहे.'कंगनाने पुढे लिहिले- 'पण जी लोक ही अपेक्षा करत आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की पठाण हा फक्त एक चित्रपट आहे. इथे फक्त जय श्री रामचं गुंजेल.'



कंगनाने आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं की, 'माझं मत आहे की भारतीय मुस्लिम हे देशभक्त आणि अफगाण पठाणांपेक्षा खूप वेगळे आहेत...तात्पर्य असं की, भारत कधीच अफगाणिस्तान होणार नाही, अफगाणिस्तानमध्ये काय चालले आहे ते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्याभागतली परिस्थिती ही नर्काच्या पलीकडे आहे. कथेचा विचार केला तर चित्रपटाचं नावं 'पठाण' योग्य नाव आहे. तो भारतीय पठाण आहे.'सध्या कंगना तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने