मस्क आल्यापासून ट्विटरला लागलं ग्रहण, 20 कोटी यूजर्सचा डेटा; तुमचे अकाउंट असेल तर सावधान

अमेरिका : मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचा डेटा पुन्हा एकद लीक झाल्याचे समोर आले आहे. एका यूजरने हॅकर फोरमवर ट्विटरशी संबंधित डेटा पब्लिश केला आहे. या यूजरने दावा केला आहे की ट्विटरच्या २३ कोटींपेक्षा अधिक यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. या डेटामध्ये यूजरच्या ईमेल आणि स्क्रीन नेमचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटरच्या ४० कोटी यूजर्सचा डेटा लीक झाला होता. त्यानंतर हा डेटा लीकची आणखी एक घटना समोर आली आहे.आता लीक झालेल्या डेटामध्ये प्रमुख राजकीय नेते, पत्रकार आणि बँकर्सच्या नाव आणि ईमेल अ‍ॅड्रेसचा समावेश आहे. ट्विटरच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे हा डेटा चोरी लीक झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता ही त्रुटी दूर करण्यात आली आहे.




कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलैपर्यंत ट्विटरच्या डेली अ‍ॅक्टिव्ह यूजर्सची संख्या २३.७८ कोटी होती. हा आकडा इलॉन मस्क यांनी कंपनीला खरेदी करण्याच्या आधीचा आहे. मस्क यांनी कंपनी खरेदी केल्यापासून सातत्याने डेटा लीकच्या घटना घडत आहे.काही दिवसांपूर्वी ट्विटरचे माजी सिक्योरिटी चीफ Peiter “Mudge” Zatko यांनी माहिती दिली होती की, ट्विटर अद्याप एका जुन्या सॉफ्टवेअरवर काम करत आहे. वर्ष २०२० मध्ये फ्लोरिडा येथील एका तरूणावर जो बाइडन, इलॉन मस्क सारख्या प्रसिद्ध व्यक्तीचा डेटा लीक करण्यात आल्याचा आरोप झाला होता.

मागील महिन्यात लीक झाला होता डेटा

काही दिवसांपूर्वीच ट्विटरच्या जवळपास ४० कोटी यूजर्सचा डेटा लीक झाला होता. हा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. डेटा लीक झाल्याचा पुरावा म्हणून हॅकरने यूजर्सचे नाव, ईमेल, फॉलोअर्स संख्या आणि मोबाइल नंबर देखील शेअर केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने