मेजर ध्यानचंदचे शिष्य काढतायेत झोपडीत आयुष्य! एकेकाळी केलेला हॉलंडचा पराभव

मुंबई:  आपल्या देशाचा मान वाढावा यासाठी खेळाडू अहोरात्र मेहनत घेत असतात, त्यांचं पूर्ण लक्ष त्यांच्या खेळावर असतं. तरीही यात आपल्याला यश मिळेलच आणि आपण भारतासाठी खेळू शकूच असं काही नाही. खेळाडू जीवाचं रान करतात आणि देशासाठी खेळतात पण यानंतर जर तो खेळडू आपल्या खेळात स्वतःचं नाव कमवू शकला नाही तर त्याची कारकीर्द पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता असते, यानंतर अशा खेळाडूंच हाड कुत्रही खाणार नाही इतकी सुद्धा वाईट अवस्था त्यांची होऊ शकते. याचं उदाहरण म्हणजे टेकचंद यादव.

एकेकाळी हॉकी स्टिकची दहशत होती

टेकचंद यादव (82) हे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील कॅंट भागात एका पडक्या झोपडीत राहताय. आश्चर्य म्हणजे हे एक आंतरराष्ट्रीय हॉकीपटू होते आणि मेजर ध्यानचंद यांचे शिष्य तर हॉकीपटू आणि रेफ्री मोहर सिंग यांचे गुरू आहेत. 1961 मध्ये ज्या भारतीय संघाने हॉकी सामन्यात हॉलंडचा पराभव केला होता, टेकचंद हे त्या संघाचे महत्त्वाचे खेळाडू होते.

नक्की कोण आहेत टेकचंद यादव?

टेकचंद यांचा जन्म 9 डिसेंबर 1940 रोजी कॅंट परिसरात झाला. त्यांचे वडील दुधाचा व्यवसाय करायचे. टेकचंद शाळेत शिकत असतानात्यांनी इतर मुलांना हॉकी खेळतांना इतर मुलांना बघितलं होतं आणि त्यांना हॉकी खेळण्याची प्रेरणा मिळाली.त्यांनी आपली पहिली हॉकी ही झाडांच्या फांद्या तोडून बनवलेली आणि मित्रांसोबत हा खेळ खेळायला सुरुवात केली. जेव्हा त्यांच्या वडिलांनी या खेळात त्यांची आवड पाहिली तेव्हा त्यांना खरी हॉकी स्टिक मिळाली.टेकचंदने मोठे झाल्यावर हॉकीची आवड कायम ठेवली. टेकचंद यांचा खेळ बघून त्यांचं DHA संघात सिलेक्शन केलं गेलं. जिल्हा हॉकी असोसिएशनच्या संघात खेळतांना भोपाळ, दिल्ली, चंदीगडसह अनेक शहरांमध्ये त्यांनी स्पर्धा खेळल्या आणि जिंकल्या.



जर ध्यानचंद गुरु म्हणून लाभले

1960 साली मेजर ध्यानचंद एमआरसी सागर इथे होते, यावेळी त्यांनी सागर आणि जबलपूरच्या हॉकीपटूंना बोलावून प्रशिक्षण दिले. त्या मोजक्या खेळाडूंमध्ये टेकचंद यांचाही समावेश होता. मेजर ध्यानचंद 3 महिने तिथेच राहिले आणि त्यांनी खेळाडूंना अशा टिप्स दिल्या की त्यांचे आयुष्यच बदलून गेले.एका वर्षानंतर भोपाळमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा झाली. या स्पर्धेत अनेक देशांतील हॉकी संघ सहभागी झाले होते. यादरम्यान टेकचंद यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. हा सामना हॉलंड विरुद्ध होता. भारतीय संघाने हा सामना मोठ्या फरकाने जिंकलेला.

परिस्थितीने हॉकीतून सुटका करून घेतली

जीवनसंघर्षाने त्यांच्या हातातील हॉकी स्टिक हिसकावून घेतली आणि या खेळापासून त्याचे अंतर वाढू लागले. त्यांच्याकडे असलेली सर्व पदके, प्रमाणपत्रे किंवा पुरस्कार नष्ट झाल्याचे टेकचंद सांगतात. ते म्हणतात की ते सध्या ज्या स्थितीत आहे त्याबद्दल त्यांना तक्रार नाही, पण सध्याची हॉकीची दुर्दशा बघून दुःख होतं. भारतात खेळाचे व्यापारीकरण झाल्यापासून हॉकीचा नाश झाला आहे, अस त्यांचे मत आहे.

टेकचंद यांचं कुटुंब

टेकचंद यांना पत्नी आणि मुले नाहीत. ते आपल्या कुटुंबाच्या मालकीच्या पडक्या घरात राहतात. त्यांचे भाऊ दोन वेळचे अन्न पाठवतात. त्यांच्या घराची परिस्थिती अशी आहे की हॉकीशी संबंधित अविस्मरणीय गोष्टीही त्यांच्याकडे उरल्या नाहीत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने