जुळ्या बहिणींच्या लग्नापासून ते उर्फी जावेद; वाचा यंदा महिला आयोगातल गाजलेली प्रकरणं

मुंबई: महिला आयोग हे महिलांच्या हक्कांसाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध काम करणारं आयोग आहे. त्यामुळे महिलांना किंवा महिलांसंदर्भात कोणताही न्याय मागण्यासाठी हे आयोग महत्वपूर्ण भूमिका बजावत असतं. त्यादृष्टीने २०२२-२३ दरम्यान महिला आयोगाकडे गेलेली आणि गाजलेली प्रकरणं आपण बघुया.

जुळ्या बहिणींच लग्न

गेल्या वर्षाखेर डिसेंबर २०२२ मध्ये सोलापुर जिल्ह्यातल्या अकलूज गावातील जुळ्या बहिणींनी एकाच पुरुषाशी एकाच मांडवात लग्न केलं. हे प्रकरण त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. दोघी बहिणी एकाच वेळी एकाच पुरुषाशी लग्न करायला तयार कशा झाल्या इथपासून हा वाद सुरू झाला. शेवटी यात महिला आयोगाला यासंदर्भात चौकशी करण्यासाठीची नोटीस स्थानिक पोलिसांना पाठवावी लागली होती. आदेश आयोगाचा असल्याने त्यावर पोलिसांनी कृती करणे सक्तीचे होते. त्यानुसार चौकशीदेखील झाली.



उर्फी जावेद - चित्रा वाघ वाद

यंदा नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आणखी एक गाजलेलं प्रकरण म्हणजे उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जो वाद निर्माण केला होता, त्यासंदर्भात महिला आयोगाने हस्तक्षेप करावा असं त्यांचं म्हणणं होतं. पण यासंदर्भात त्यांनी बोलताना राज्य महिला आयोगाचा अवमान होईल अशी वक्तव्ये केली आहे. शिवाय जुन्या नोटीशीचा चुकीचा अर्थ प्रसार माध्यमांसमोर मांडून जनतेत आयोगाविषयी अविश्वास निर्माण केला जात आहे; अशी भूमिका मांडत महिला आयोगाने वाघ यांना अवमानाची नोटीस पाठवली होती.

मुलीचा खून

नात्याला काळीमा फासणारी एक घटना नुकतीच नांदेड जिल्ह्यातल्या महिपाल पिंपरी गावात घडली. मुलीचं प्रेम प्रकरण होतं म्हणून बापानेच कट करून मुलीचा गळा दाबून खून केला. आणि वीजेच्या धक्क्याने गेल्याचा बनाव केला. पण मैत्रिणीने महिला आयोगाकडे तक्रार केल्याने प्रकरण उघडकीस आलं. त्याविषयी चौकशी झाली. पण आता पोलीस मात्र महिला आयोगाकडे अशी कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसल्याचं सांगत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने