'काम मिळावं म्हणून राम गोपाल वर्माकडे मी अक्षरशः..',मनोज बाजपेयीचा भूतकाळ हैराण करणारा

मुंबई: मनोज बाजपेयीनं नुकतंच एका मुलाखतीत आपला स्ट्रगल काळ सांगितला आहे. सुरुवातीच्या काळात आपण छोट्या-मोठ्या भूमिका मिळवण्यासाठी देखील लोकांच्या हातापाया पडायचो असा खुलासा त्यानं केला आहे.आपल्या करिअरमधील स्ट्रगलच्या दिवसांना मनोज बाजपेयीनं पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. त्यानं राम गोपाल वर्मांकडे तो काम मागायला गेला तेव्हाची एक आठवण शेअर केली.राम गोपाल वर्माकडे गेल्यावर आपल्याला पैशाची खूप गरज आहे असं मनोज बाजपेयी गयावया करत म्हणाला होता. Manoj Bajpayeeने आपल्या करिअरची सर्वात धमाकेदार सुरुवात ही 'सत्या' सिनेमातून केली होती. तो म्हणाला,''मी मुंबईत रहात होतो. पण मराठी भाषेचा लहेजा फारसा मला येत नव्हता. मी हिंदी-हिंदी भोजपूरी भाषा बोलणारा माणूस होतो''.






''माझं काहीसं असं घडलं की जसं एका टीममध्ये नेटप्रॅक्टिससाठी बॅट्समन,बॉलर घेऊन जातात ना..त्यांना सांगितलेलं असतं खेळायची संधी मिळणार नाही पण सिलेक्शन करुन ठेवतात...फक्त नेटप्रॅक्टिस करुन घेतात..तसाच मी नेटप्रॅक्टिस करायला गेलो आणिअ अचानक दोन बॉल मस्त खेळून गेलो आणि दुरुन विराटनं ते पाहिलं...तर माझं भाग्य काहीसं असं घडलं''.मनोज बाजपेयी पुढे म्हणाला,''मी फक्त असंच सिनेमात काम मिळतंय का ते पहायला गेलो होतो,त्यामध्ये ३-४ छोट्या भूमिका होत्या. त्याचा लेखक कनन अय्यर होता. त्यांनी सांगितलं की काही छोटे रोल आहेत त्यासाठी येऊन जा''.''करणला मी 'बॅंडिड क्वीन' सिनेमापासून ओळखत होतो. तिथे पोहोचल्यावर दिग्दर्शकाच्या खूर्चीत बसलेल्या राम गोपाल वर्मांनी तेव्हा मला विचारलं होतं की, 'तू काय केलं आहेस काम आधी...मी म्हटलं, 'स्वाभिमान'. तेव्हा ते म्हणाले, 'कोणता सिनेमा केला आहेस का?', मी म्हटलं-'बॅंडिड क्वीन''.

तेव्हा ते म्हणाले,''बॅंडिड क्वीन माझा फेव्हरेट सिनेमा आहे. त्यामध्ये तुझी भूमिका काय होती? मी म्हटलं...तुम्ही ओळखू नाही शकणार जर मी सांगितली माझी भूमिका तर...सायलेंट रोल होता. त्यानं पुन्हा विचारलं की-कोणता रोल होता? सायलेंट रोल होता''.''त्यांनी पुन्हा विचारलं..तरी सांग कोणता रोल होता..मी म्हटलं-मान सिंग..तेव्हा ते आपल्या बसल्या जागेवर ताडकन उठून उभे राहिले. आणि म्हणाले की, तुला तर मी चार वर्षांपासून शोधत होतो''.

राम गोपाल वर्मा मला म्हणाले,''एक काम कर,तू 'दौड' सिनेमाला सोड..माझ्याकडे तुझ्यासाठी एक सिनेमा आहे. आणि यात तू लीड व्यक्तिरेखा साकारणार आहेस''.''तेव्हा मी अगदी गयावया करत म्हणालो...सर,मला करु देत हा सिनेमा कारण मला पैशाची नितांत गरज आहे. तेव्हा रामू म्हणाला..माझ्यावर विश्वास ठेव,मी तुला काम देणार,तुझ्यासोबत सिनेमा बनवणार''.मनोज बाजपेयी पुढे म्हणाला,''रामूने मला ती भूमिका द्यायचं निश्चित केलं आणि ३०००० हजार रुपये देण्याचं कबूल केलं. माझ्यासाठी ३० हजार म्हणजे पूर्ण दिवसाचं भाडं होतं...आणि असा सुरु झाला 'सत्या' सिनेमाचा प्रवास''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने