घाम फोडला! मिलिंद सोमणचे फोटो काढणं पापाराझींना पडलं महागात...

मुंबई: बॉलिवूड अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण हा त्याच्या अभिनयापेक्षा फिटनेससाठी जास्त ओळखला जातो. वयाच्या ५७ व्या वर्षी या मिलिंद सोमणने आपल्या फिटनेसने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.मिलिंद सोमणच्या यांच्या फिटनेसमागील रहस्य काय आहे हे सर्व चाहत्यांना जाणून घ्यायचे असतेच. मिलिंद सोमणने आज त्याच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आणि पापाराझींकडून करून तसं काही करुन घेतले.मिलिंद सोमणचा फोटो काढणे ही काही छोटी गोष्ट नाही. मिलिंद सोमणला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींना खूप काही करावे लागते. मिलिंद सोमणचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे.



जेव्हा सोमणला पापाराझींनी फोटोसाठी पोज देण्यासाठी विचारले तेव्हा मिलिंदने पोज देण्याऐवजी चक्क पापाराझींना त्यासाठी पुश-अप करण्यासाठी सांगितले.व्हिडिओमध्ये पापाराझी 20-20 पुश-अप करताना दिसत आहेत. त्याचवेळी मिलिंद सोमण पुश-अप्स दरम्यान कोणीही चींटीग करू नये म्हणून खुप रागवतांना दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये पापाराझींना आज घाम फुटला असेलं असं ऐकू येत आहे. एका बाजूला पापाराझी पुश-अप करत आहेत. दुसरीकडे मिलिंद सोमण हा क्षण आनंदाने कॅमेऱ्यात कैद करत आहेत.मिलिंद सोमणला पापाराझींसोबत पुश-अप करताना पाहून प्रत्येकालाच हसू येत आहे. युजर्सने व्हिडिओचा आनंद घेत कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका यूजर्सने लिहिले मी ही मिलिंद सोमणचा फोटो काढायला जाईल. तर दुसऱ्या यूजर्सने लिहिले की मिलिंद सोमन आहे, सोनम नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने