दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी दीड लाख कोटी रुपयांचे करार, मुख्यमंत्र्यांनी काय काय आणलं?

मुंबई: जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. जागतिक आर्थिक परिषदेत विविध उद्योगांची गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती मिळाली आहे. त्यासाठी १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्याच दिवशी ४५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहेत.




मुख्यमंत्र्यांनी काय काय आणलं?

  • भद्रावती येथे २० हजार कोटी रू.गुंतवणुकीचा कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्यासाठी अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन कंपनीनेही सामंज्यस करार केला आहे. .या प्रकल्पातून १५ हजार रोजगारनिर्मिती होणार असून विदर्भाच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

  • विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहेत.

  • गडचिरोली येथील वरद फेरो अॅलाँइज या ब्रिटन कंपनीने स्टील प्रकल्पासाठी १ हजार ५२० कोटी गुंतणूक करण्याचा करार केला आहे. त्यातून २ हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली.

  • पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशन या उद्योगाचा १ हजार ६५० कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्रास चालना मिळणार आहे. यामुळे २ हजार रोजगार निर्मिती होईल.

  • महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बर्कशायर- हाथवे या उद्योगाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून नागरी विकासाला चालना मिळणार आहे.

  • औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार असून, या मुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळेल.

  • पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फुडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे राज्याची अन्नप्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

  • आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने